पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
मुरुमटी । वार्ताहर peth / Murmatee
पेठ तालुक्यातील फणसपाडा (पाटे) या परिसरात जवळ-जवळ तीन तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने येथील असलेल्या पुलावरुन पुराचे पाणी गेल्याने वाहतुक ठप्प झाली होती.
त्यामुळे त्वरीत या पुलाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.अजूनही जनतेला पुर पाण्यातुनच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
फणसपाड्यावर जाण्यासाठी एक लहानशी फरशी असल्यामुळे थोडा फार पाऊस झाला तरी फरशीवरुन लगेच पाणी जाते. त्यामुळे परिसरातील नागरीकांना बाजारपेठेत, दवाखान्यात,शैक्षणिक शिक्षणासाठी याच पुलावरुन ये-जा करावी लागत असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे.
फणसपाडा (पाटे) परीसरात तीन तास पावसाने धूमाकाळ घातल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना 3 ते 4 तास नदिच्या कडेला उभे राहवे लागत आहे. जर एखाद्या रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यासाठी या पुलावरुन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्वरीत या पुलाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.