पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

सप्तशृंगीगड । वार्ताहर | Saptashringigad

सप्तशृंगी गडावरील (Saptashringigad) मेटेल डिटेक्टर (Metal detector) शोभेचे बाहुले या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाल्याचा राग आल्याने ट्रस्टचे सुरक्षाप्रमुख यशवंत देशमुख (Yashwant Deshmukh) यांनी सप्तशृंगी गडावरील पत्रकार निलेश कदम (Journalist Nilesh Kadam) यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Death threats)

दिल्याप्रकरणी निलेश कदम यांच्या तक्रारीन्वये कळवण पोलिसांनी (kalwan police) फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी नाशिक (nashik) ग्रामीण पत्रकार संघ (Grameen Patrakar Sangh) संलग्न कळवण तालुका (kalwan taluka) मराठी पत्रकार संघाने (Marathi Press Association) पोलीस जमादार वाय. झेड. भोये यांना निवेदन (memorandum) देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सप्तशृंगी गडावरील मेटल डिटेक्टर शोभेचे बाहुले ही बातमी प्रसिद्ध केल्यामुळे सुरक्षाप्रमुख यशवंत देशमुख यांना राग आला. त्यांनी दि. 20 व 25 जानेवारी रोजी मला जीवे मारण्याची धमकी दिली असून माझे सेवेचे 5 वर्षे शिल्लक आहे. तुला दाखवून देतो अशी धमकी दिल्यामुळे देशमुख यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे तक्रारीत नमूद करुन कारवाईची मागणी केली आहे.

पत्रकार निलेश कदम यांच्या तक्रारीन्वये कळवण पोलिसांनी (kalwa police) फिर्याद दाखल केली आहे. कदम यांच्या तक्रारीनुसार सुरक्षाप्रमुख यशवंत देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी नाशिक ग्रामीण पत्रकार संघ संलग्न कळवण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रविंद्र पगार, कार्याध्यक्ष राकेश हिरे, सदस्य बापू देवरे, तुषार बर्डे, लक्ष्मीकांत पाठक, किरण अहिरे, निलेश कदम, इम्रान शहा, दीपक वाघ यांनी कळवण पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टमधील सुरक्षा कर्मचारी सुरक्षा प्रमुख यशवंत देशमुख यांच्या मनमानी कारभाराला सुरक्षा कर्मचारी कंटाळले आहेत. देविभक्तांची सुरक्षा करणार्‍या सुरक्षा प्रमुखांच्या सुरक्षेपासून महिला सुरक्षा कर्मचारी देखील सुरक्षित नसून त्यांची छेडछाड करण्याची मजल सुरक्षा प्रमुखांची गेली आहे. या प्रकरणी कर्मचार्‍यांच्या संघटनेने ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ आणि व्यवस्थापक यांचे लक्ष वेधून छेडछाड प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. मात्र त्यांनी सुरक्षा प्रमुखांना पाठीशी घातले असून या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी

कळवण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com