पत्रकारांच्या जबाबदारीत वाढ : ना. भुसे

पत्रकारांच्या जबाबदारीत वाढ : ना. भुसे

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्यातील पत्रकारांनी (Journalists) निस्पृह आणि विश्वासार्ह पत्रकारिता (credible journalism) केली असून सध्या पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहातही त्यांनी याच भावनेतून काम करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी केले.

नांदगाव तालुका (nandgaon taluka) मराठी पत्रकार संघ (Marathi Press Association) व मनमाड शहर मराठी पत्रकार संघातर्फे (Manmad City Marathi Journalists Sangha) पत्रकार दिनानिमित्त पत्रकार गुणगौरव, कार्यशाळा व उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभाच्या व्दितीय सत्रात ना. भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. सुहास कांदे (mla suhas kande) होते. अत्यंत धावपळीच्या व धकाधकीच्या काळात माध्यम प्रतिनिधी काम करीत असतो.

अशा पत्रकारांचा सन्मान करणे हे पत्रकारांच्या जीवनात आनंद देणारे क्षण असल्याचे सांगत आजच्या काळात आधुनिकतेबरोबरच पत्रकारांची जबाबदारीही वाढली असल्याचे ना. भुसे यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. कांदे यांनीही तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत मनमाड-नांदगाव (manmad-nandgaon) शहरात पत्रकार भवन व पत्रकार कॉलनी निर्मितीचा मानस असल्याचे सूतोवाच केले.

पत्रकार संघाचे तालुका समन्वयक अमोल खरे यांनी प्रास्ताविक केले. ना. भुसे व आ. कांदे यांच्या हस्ते उत्कृष्ट बातमी लेखन स्पर्धेतील गुणवंत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. नाशिक शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, मार्गदर्शक भास्कर कदम, मोतीराम पिंगळे, नरेश गुजराथी, अशोक परदेशी, सुरेश शेळके आदी व्यासपिठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप देशपांडे यांनी केले. शेवटी संदीप जेजुरकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.