ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील जोरण ग्रामपंचायतीची निवडणुक माघारीच्या दिवशी बिनविरोध करण्यात आली. गेल्या ३५ वर्षा पासून या गावाची ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध झालेली नव्हती...

परंतु, कायमच निवडणुकीमुळे गावातील वातावरण दूषित करण्यापेक्षा आपणा सर्वानी एकत्र येवून सर्व ९ जागा बिनविरोध करण्याचा विचार माघारीच्या दिवशी घेण्यात आला.

प्रभाग १ मधून १)मालतीबाई प्रकाश गांगुर्ड ,२) सुरेश दगू चारोस्कर ,३) मंगेश पोपट लोखडे तर प्रभाग २ मधून १) गोंविद्र दामोधर गायकवाड.२) रेणुका अक्षय गायकवाड.३) निता विनायक शेवरे. तसेच प्रभाग ३ मधून १) अशोक सखाराम गायकवाड .२) ज्ञानेश्वर पुडलिंक भुसारे.३) भामा नामदेव गावित या तीनही प्रभागातील उमेदवाराची माघारीच्या अखेरच्या दिवशी गावातील लोकांनी एकत्र येवून समजूत काढून निवडणुक बिनविरोध केली.

या बिनविरोध निवडणुकीसाठी माजी आमदार रामदास चारोस्कर, सुनिल गायकवाड, शांताराम गांगोडे, विनायक शेवरे, अनिल रेहरे, सुभाष ढगे, भाऊसाहेब गुंबाडे आदीनी मार्गदर्शन केले