गुन्हेगार सुधार मेळाव्यात 7 जणांना नोकरी
USER

गुन्हेगार सुधार मेळाव्यात 7 जणांना नोकरी

जुने नाशिक । प्रतिनिधी | Old Nashik

पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांच्या संकल्पनेनुसार शहरात गुन्हेगार सुधार योजना (Criminal Reform Fair) अंतर्गत मेळावे सुरू आहे. नुकताच भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ७ जणांना नोकर्‍या देण्यात आल्या...

मेळाव्याकरीता भद्रकाली पोलीस ठाणे, मुंबई नाका पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलीस ठाणे व गंगापूर पोलीस ठाणे या चारही पोलीस स्टेशन हद्यीतील एकुण ६४ गुन्हेगार उपस्थित होते.

गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठीचे उपाय व समाजात परत सन्मानाने जगता यावे म्हणून पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण अशी गुन्हेगार सुधार योजना राबविण्यात येत आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (Sanjay Barkund), अमोल तांबे (Amol Tambe), सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना (Deepali Khanna) यांनी मार्गदर्शन केले.

तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी समिर कुलकर्णी व गायकवाड यांनी गुन्हेगार सुधार मेळाव्या करीता उपस्थित असलेल्या गुन्हेगारांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन केले.

मानसोपचार तज्ञ शिरीषराजे पाटील व कविता निकम यांनी उपस्थित असलेल्या गुन्हेगारांना समुपदेशन केले. अ‍ॅड. गणेश गुरुनाथ देसाई यांनी गुन्हेगारांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता कायदेशीर बाबींची माहिती देवून मार्गदर्शन केले.

मेळाव्यामध्ये चारही पोलीस स्टेशनच्या एकूण ६४ गुन्हेगारांनी मेळाव्याचा लाभ घेतला. हिस्ट्रीशिटमधून (Histisheet) एकूण १६ नावे कमी करण्यात आले. सर्व्हेलन्स रजिस्टरमधून (Surveillance Register) ११ नावे कमी करण्यात आले.

नॉनक्रिमीनल रजिस्टरमधील (Noncriminal Register) २६ गुन्हेगारांचे नावे कमी करण्यात आले तर तडीपार संदर्भात २ गुन्हेगारांचा फेरविचार करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

मेळाव्यात प्रत्येक गुन्हेगाराचे वैयक्तीक समुपदेशन करून नाशिक शहरातील नामांकीत उद्योजक, सेक्युरिटी एजन्सीज, समाजसेवक, व्यवसायिकांनी वेळेवर माहिती घेऊन ७ गुन्हेगारांना तत्काळ नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com