<p>नाशिक | Nashik</p><p>संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. </p> .<p>याप्रसंगी सर्वात प्रथम भंडारा येथील मृत्यू पावलेल्या नवजात शिशुना श्रद्धांजली वाहण्यात आली. शासकीय यंत्रणेचा निषेध करण्यात आला. तसेच नाशिक रोड अरिंगळे मळा येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.</p><p>यावेळी शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाहीर संविधान गायकवाड क्रांतीगीत व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक किरण पवार, मयूर पवार, बंटी भागवत यांनी केले.</p>