कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास

कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास

नाशिक रोड |प्रतिनिधी | Nashik Road

बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख 37 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने (Gold and silver jewellery) चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सदरची चोरी सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे.

कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास
हा तर विरोधकांचा डाव; 'त्या' नोटीसला संजय राऊतांचे उत्तर

संकेत श्रीराम पाठक (रा. जय भवानी रोड आडके नगर) यांनी यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाठक यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व कपाटातील सुमारे दोन लाख 37 हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले.

व्हॉट्सअ‍प ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सदरची घटना पाठक यांना समजताच त्यांनी उपनगर पोलीस स्टेशन (Police Station) गाठले व तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पगारे हे करत आहे.

कुलूप तोडून लाखोंचे दागिने लंपास
अवैध व बनावट दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा - भुजबळ
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com