नाशिक | Nashik

गंगापूर रोडवरील एका लॉन्समधून चोरट्याने नवरदेवाच्या आईची पर्स चोरुन त्यातील दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 16 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास ताजने (रा. साई राम नगर, ओझर मिग, नाशिक ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाचा विवाह दि. 17 डिसेंबर 2020 रोजी गंगापूर रोडवरील कवडे गार्डन लॉन्स येथे होता.

यावेळी त्यांच्या पत्नी कमल या मुलाच्या लग्नात आलेल्या भेटवस्तूंजवळ बसलेल्या असताना त्यांनी हातातील पर्स जवळील खुर्चीवर ठेवली, त्याचवेळी अज्ञात चोरट्याने संधी साधून ही पर्स लांबविली.

या पर्समध्ये एक मोबाईल, एक लाख 6 हजार रुपयांची रक्कम, 10 हजार रुपयांची सोन्याची पोत व काही महत्त्त्वाचे कागदपत्रे असा एकूण 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पोलीस नाईक भडिंगे तपास करत आहेत.