देशमुख यांना जीवनसाधना पुरस्कार

देशमुख यांना जीवनसाधना पुरस्कार

लखमापूर । वार्ताहर Lakhmapur

सामाजिक क्षेत्रात (Social Sector) केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ज्योतीताई देशमुख (Jyotitai Deshmukh) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) वतीने

जीवनसाधना गौरव पुरस्काराने (Jeevansadhana Gaurav Award) सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या 73 व्या वर्धापनदिनी (Anniversary) जेष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे (Senior Actor Dr. Mohan Agashe) यांच्या हस्ते या पुरस्काराचे पुणे येथे विद्यापीठात वितरण झाले.

पुणे विद्यापीठाच्या (University of Pune) वतीने दरवर्षी स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील व्यक्तींना ‘जीवन साधना’ पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यंदाच्या 73 व्या स्थापना दिवसानिमिताने पुणे (pune) येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू डॉ. एम. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योतीताई देशमुख यांना ‘जीवन साधना’ गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मानपत्राचे वाचन सिनेट सदस्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. ज्योती देशमुख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar),

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal), कादवाचे अध्यक्ष श्रीराम शटे (shriram shete), मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार (Nilima Pawar to the General Secretary of MVP), बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले आदींनी अभिनंदन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com