अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक | Nashik

श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा (Ajit Surana) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा (Savitribai Phule Pune University) मानाचा जीवन साधना गौरव पुरस्कार २०२३ (Jeevan Sadhana Gaurav Award 2023) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १० फेब्रुवारी रोजी विद्यापिठाच्या प्रांगणात ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रदान करण्यात येणार आहे...

यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, प्रतिभावंत संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, समाजसेवक व उद्योगपती सायरन पुनावाला, पोपट पवार, गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, ज्येष्ठ साहित्यिक द मा .मिरासदार,अर्थतज्ञ नरेंद्र जाधव व ज्येष्ठ समाजसेवक शांतीलालजी मुथा यांच्यासह विविध क्षेत्रातील आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.तसेच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सुराणा यांचा महावीर इंटरनॅशनल (Mahavir International) नाशिकतर्फे (Nashik) सन्मान करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर
सत्यजित तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ

दरम्यान, या पुरस्काराबद्दल बोलतांना सुराणा म्हणाले की, श्री नेमीनाथ जैन ब्रम्हाचार्य आश्रमाने चांदवड (Chandwad) सारख्या ग्रामीण भागातील तालुक्यात केलेल्या भरीव कार्याची दखल एका प्रतिष्ठित विद्यापीठाने घेतल्याचे समाधान आहे. हा पुरस्कार म्हणजे आमच्या १७ विश्वस्तांच्या अथक कार्याचे फलित आहे. ग्रमीण भागात अधिक जोमाने शैक्षणिक कार्य करण्यास आणखी बळ या परस्करातून मिळाले आहे. या पुरस्कारासाठी आमच्या संस्थेची निवड केल्याबद्दल विद्यापीठाचे आम्ही आाभारी आहोत, असे त्यांनी सांगितले.

अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर
... तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल नको - उद्धव ठाकरे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com