प्रवेश परीक्षा
प्रवेश परीक्षा
नाशिक

२९ ऑगस्टला हॉटेल मॅनेजमेंटची जेईई

अधिकृत संकेतस्थळावर घोषणा

Bharat Pagare

नाशिक | Nashik

एनसीएचएम जेईई २०२० अर्थात नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम येत्या २९ ऑगस्ट (शनिवारी) होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेच्या तारखेची घोषणा संकेतस्थळावर केली आहे.

ही परीक्षा २९ ऑगस्ट २०२० रोजी होणार असून दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. ही परीक्षा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी घेण्यात येते. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश या कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेद्वारे होतात. एनटीएने या संदर्भातील परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थी आणि पालकांना असे आवाहन करण्यात येत आहे की परीक्षेसंदर्भातील सर्व अद्ययावत माहितीसाठी nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांना भेट देत राहावी. परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना १५ दिवस अगोदर आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. अॅडमिट कार्ड nta.ac.in आणि nchmejee.nta.nic.in या संकेतस्थळांवरून डाऊनलोड करता येतील.

चाैकट१

परीक्षेच्या आधिक माहितीसीठी विद्यार्थी व पालकांनी ८२८७४७१८५२, ९६५०१७३६६८, ९५९९६७६९५३ व ८८८२३५६८०३ या संपर्क क्रमांकावर व nchm@nta.ac.in वर संपर्क करावा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com