जेईई मेन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात

परीक्षेसाठी नवीन नियमावली जाहीर
जेईई मेन
जेईई मेन

नाशिक | Nashik

राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशासाठी एनटीएकडून घेतली जाणारी जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यासाठी एजन्सीने जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नियमावली व मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत.

करोना लॉकडाऊनमुळे अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची अधिक काळजी घेण्यात येणार असून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे तपासणी आणि सॅनिटायझेशनसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान एक तास लवकर येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना केंद्रावर येण्यासाठी वेळेचा स्लॉट देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवले जाईल. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे जेईई मेन २०२० प्रवेश पत्र आणि ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे.

परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही वस्तू सोबत नेण्यास परवानगी नसणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही पिशव्यांना परवानगी दिली जाणार नाही. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रमांक असलेल्या आसनावरच बसावे. पेपर-२ साठी विद्यार्थ्यांना त्यांचे भूमिती बॉक्स, कलर पेन्सिल आणि रंग घेण्याची परवानगी असणार आहे.

मात्र, वॉटर कलर वापरता येणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान रफ वर्क करण्यासाठी एक कोरा कागद दिला जाणार आहे. त्याचबरोबर पेन, पेन्सिलही देण्यात येणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी नाव लिहावे, परीक्षा झाल्यानंतर तो पेपर शिक्षकांना परत करावा. विद्यार्थ्यांनी आपल्या हजेरीसोबतच आपला फोटो आणि स्वाक्षरी नीट आहे की, नाही याची खात्री करून घ्यावी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com