२० जुलैपासून जेईई मेन्स परीक्षा

२० जुलैपासून जेईई मेन्स परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे जेईई मेन्स २०२१ (JEE Mains) च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे. उमेदवारांना लिंकवर १२ जुलैपर्यंत नोंदणी करून शुल्क भरता येईल. जेईई मेनचे तिसऱ्या सत्राची परीक्षा (Exams) दि. २० ते २५ जुलैपर्यंत तर चौथे सत्र दि. २७ जुलैपासून ते २ ऑगस्टपर्यंत होणार आहे...

यासाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट https://jeemain.nta.nic.in वर उपलब्ध होईल. ज्या विद्यार्थ्यांनी एप्रिल किंवा मेच्या सत्रासाठी अर्ज केला आहे, ते अर्ज अपलोड करू शकतात. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांसाठी शहरांची संख्या २३२ ने वाढवून ३३४ करण्यात आली आहे.

प्रत्येक क्षेत्रात परीक्षा केंद्रांची संख्या ६६० ने वाढवून ८२८ करण्यात आली. एनटीएनने दिलेल्या माहितीनुसार, एकूण सहा लाखांहून अधिक उमेदवारांनी जेईई मेन एप्रिल २०२१ साठी नोंदणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com