नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. आयआयटीमधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेतली जाते.

परीक्षेच्या सिलॅबससह पेपर १ आणि पेपर २ ची ऑनलाइन मॉक टेस्टही अपलोड करण्यात आली आहे. यंदा आयआयटी खरगपूर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन करणार आहे.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आयआयटी खरगपूर द्वारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन शनिवार ३ जुलै २०२१ रोजी करण्यात येणार आहे.

पेपर-१ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ च्या तयारीसाठी ऑनलाइन सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पेपर १ आणि पेपर २ दोन्हीसाठी ऑनलाइन मॉक टेस्ट जारी करण्यात आली आहे.

जेईई अॅडव्हान्स्ड सिलॅबस २०२१

फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह आर्किटेक्चर एप्टीट्यूड टेस्ट (AAT)चा अभ्यासक्रमदेखील जारी करण्यात आला आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ मध्ये प्रश्न विचारण्यात येतील.