शिंगवे सोसायटी निवडणुकीत जय मल्हार पॅनलची बाजी

शिंगवे सोसायटी निवडणुकीत जय मल्हार पॅनलची बाजी

नाशिक | Nashik

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आणि निफाड (Niphad) तालुक्यात प्रतिष्ठेचा विषय समजण्यात येणार्‍या शिंगवे विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (election) शहाजीराजे डेर्ले (Shahaji Derle) व गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या नेतृत्वात जय मल्हार पॅनलने (Jay Malhar Panel) एकहाती विजय मिळवला आहे...

या पॅनलचे सर्व १३ उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येताच गावात ‘जय मल्हारचा’ एकच जल्लोष झाला. निफाड तालुक्यात (Niphad Taluka) शिंगवे सोसायटीची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख जपण्यासाठी ‘जय मल्हार सहकार पॅनल’ची निर्मिती झाली. सोसायटीच्या सभासदांनी आता कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता जय मल्हार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पॅनलचे नेते शहाजी डेर्ले यांनी केले.

तत्पूर्वी, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ नेत्यांसह गोकुळ गिते यांनीही प्रयत्न केले. पण विरोधकांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. मतदारांच्या विश्वासाच्या बळावर जय मल्हार पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. गावकर्‍यांच्या वतीने विजयी उमेदवारांसह शहाजी डेर्ले व गोकुळ गिते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पॅनलचे उमेदवार निवडुन आणण्यासाठी सरपंच प्रभाकर रायते, रतन गिते, रामदास गिते, साहेबराव डेर्ले आदींनी परिश्रम घेतले.

...म्हणून एकतर्फी विजय

पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे माजी संचालक राहिलेले गोकुळ गिते यांनी पॅनल निर्मिती केली. पॅनलमध्ये ज्येष्ठ उमेदवारांना आदराचे स्थान देत त्यांना मान दिला. याशिवाय नवीन उमेदवारांना संधी देताना त्यांची निवड कुठेही चुकणार नाही, याची काळजी घेतली. गोकुळ गिते यांनी भगीरथ गिते यांना११० मतांनी पराभूत केले. तसेच शहाजी डेर्ले यांनी निवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांचा पराभव केला.

उमेदवारांना मिळालेली मते

गोकुळ गिते - ४४३

शहाजी डेर्ले - ४३३

सुभाष कोरडे -३६३

प्रवीण डेर्ले - ४००

रंभाजी डेर्ले - ४३५

विलास डेर्ले - ३८९

संजय मोगल -३७८

सोपान रायते -४२३

जगन शिंदे -३७८

राजाभाऊ सानप -४०३

सिनाबई डेर्ले - ३९०

सिंधुबाई डेर्ले - ४३९

सुभाष कटारे- ४२३

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com