जवान सूरज चौबेंबर अंत्यसंस्कार

जवान सूरज चौबेंबर अंत्यसंस्कार

चांदवड । वार्ताहर Chandwad

चांदवडचे भूमिपुत्र असलेले लष्करी जवान लान्स नायक सूरज उल्हास चौबे (33) यांचे चंदीगड येथे काविळ आजाराने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव चांदवड येथे आणल्यानंतर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी लष्करी अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित होता. सूरज चौबे गेल्या बारा वर्षांपासून सीओआरपीएस सिग्नल बटालियनमध्ये अंबाला येथे लान्स नायक या पदावर कार्यरत होते. त्यांचे पार्थिव पुण्याहून गुरुवारी सकाळी चांदवड येथे आणण्यात आले. चांदवड येथील राहत्या घरापासून त्यांची लष्करी वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा वरचे गाव श्रीरामरोड, शिवाजी चौक, सोमवार पेठ आठवडे बाजार तळ, चांदवड- मनमाडरोड मार्गे मुंबई-आग्रा महामार्गलगत असलेल्या अमरधाम येथे गेली.

त्यांचा लहान मुलगा दक्ष याने त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, सुभेदार तुकाराम खैरनार, अशोक काका व्यवहारे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com