
दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी तालुक्यातील(Dindori Taluka ) निळवंडी( Nilvandi ) येथील सैन्यदलातील जवान आदित्य अशोक जाधव( Ashok Jadhav) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून याबाबत शासकीय यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या घटनेबाबत निळवंडी व दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पार्थिव दिंडोरीत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निळवंडी येथील आदित्य जाधव सैन्यदलात लडाख येथे कार्यरत होते. त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून दूरध्वनीद्वारे त्यांचे नातेवाईक व पोलीसपाटील यांना प्राप्त झाली आहे. याबाबत शासकीय यंत्रणेशी संपर्क साधला असता अधिकृत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मृत्यू कसा झाला याबाबतही माहिती मिळालेली नाही.