जिल्ह्यातील जऊळके दिंडोरी ग्रामपंचायत आदर्शवत

विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरावाळ
जिल्ह्यातील जऊळके दिंडोरी ग्रामपंचायत आदर्शवत

जानोरी । वार्ताहर Janori

दिंडोरी तालुक्यातील जऊळके दिंडोरी ग्रामपंचायत ( Jaulke Dindori- Grampanchayat )जिल्ह्यात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले .

जऊळके दिंडोरीयेथील ग्रामपंचायतीच्या जेष्ठ नागरिक सभागृह व दशक्रिया विधी शेडच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक निवृत्ती जोंधळे हे होते. नामदार झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जऊळके दिंडोरी ग्रामपंचायतीने गावात गेल्या पाच वर्षात केलेल्या सर्वच कामाची पाहणी झिरवाळ यांनी केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य भास्कर भगरे, कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी , शंकरराव काठे, जऊळके दिंडोरी च्या सरपंच भारती जोंधळे, श्याम हिरे, गणेश तिडके, गंगाधर निखाडे, योगेश बर्डे .मधुकर केदारे उपसरपंच, नंदु सोमवंशी, शंकरराव वाघ, पांडूरंग गडकरी, दत्तु भेरे, सुभाष वाघ, लक्ष्मण देशमुख,वैभव पाटील, रमेश पालखेडे, मधुकर फुगट आदी उपस्थित होते.

गावांना स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नामदार झिरवाळांकडे करण्यात आली. यावेळी दत्तु घुमरे, निवृती जोंधळे , अशोक जोंधळे, सोमनाथ बोरस्ते, रावसाहेब जोंधळे, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com