जनता की बात : प्रभाग क्र. २७ - शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणारा नगरसेवक असावा

जनता की बात :  प्रभाग क्र. २७ - शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणारा नगरसेवक असावा

नाशिक | निशिकांत पाटील Nashik

करोना Corona काळात ज्यांची आर्थिक स्थिती खराब असेल त्यांना मदत व्हावी अशी व्यवस्था करणारा नगरसेवक Corporator असावा. नगरसेवक पदावर कार्यरत असणार्‍या व्यक्तीने आपल्या प्रभागाला एक कुटुंब समजून, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व कामे करणारा कर्तव्यनिष्ठ असावा, प्रभागातील सदस्यांना येणार्‍या अडचणी व सुख-दुःखात सहभागी होणारा हवा. प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, महिलांसाठी व तरुणांसाठी स्वयंरोजगार निर्माण होईल असे उपक्रम राबवणारा असावा,आजकाल सर्वच प्रभागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असलेली दिसून येत आहे, त्यावर अंकुश ठेवण्यात प्रयत्न करणारा हवा. जेष्ठ नागरिकांना सध्या बर्‍याच शारीरिक समस्या भेडसावत आहेत त्यावर विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत आणणारा तो असावा.

- शकुंतला खरात,घरकुल योजना

सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा व कोविड महामारीत सर्वसामान्यांना आधार देणारे आपल्या जिवाची पर्वा न करता सदैव धावणारा व युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहित करणारा लोकप्रतिनिधी हव. सर्वसामान्यांना सहकार्य करणारा व सगळ्यांचा सन्मान करणारा लोकप्रतिनिधी हवा. त्यांच्याकडे कुठलीही समस्या घेऊन गेलो तरी त्या समस्यांचे निवारण करणारा व आपल्या मेहनतीवर एक निष्ठा असणारा लोकप्रतिनिधी हवा. अगदी कमी वेळात भरपूर जनसंपर्क व मित्र परिवार जोडून ठेवणारा लोकप्रतिनिधी हवा.

- गौतम मोरे ,चुंचाळे

नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी जागरूकतेने सर्वच बाबी म्हणजे भारनियमन, पाण्याचा वॉल्व्ह सोडणे तसेच वेळोवेळी नगरसेवकांच्या किंवा काही वेळा नागरिकांच्या इच्छेप्रमाणे भूमिगत पाईपलाईनच्या गुंतागुंतीचा अभ्यास असणे आणि त्यावर एकत्रितरित्या विचार करून ठोस निर्णय घेणे हे महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी हा आपल्यातीलच असावा जेणे करून आपल्या अडचणी व भावना तो सहजरित्या समजू शकेल. फक्त निवडणूक आली म्हणुन आम्ही खूप कामे केली अशा अविर्भावात न वावरता सतत संपर्कात असणारा तो असावा. -

अजय पाटील, दत्त नगर

राज्य शासन व केंद्र शासन यांच्या कडून शहरातील विविध कामांसाठी कायमस्वरूपी कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणणे आणि त्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती नगरसेवकांना असावी.नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यासाठी किमान 30दिवसातून एकदा तरी नागरिकांची सर्वसमावेशक अशी, वॉर्ड सभा’ आयोजित करून समस्यांचा आढावा घ्यावा. त्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर नगरपालिकेद्वारे व्हावे. शहरातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन साफसफाई, स्वच्छता,कचरा व घनकचर्‍याचे निर्मूलन वगैरे सर्व बाबींकडे काटेकारपणे लक्ष द्यावे.

- गणेश मोरे ,अंबड गाव

Related Stories

No stories found.