जनता की बात : प्रभाग क्र. २६ - प्रामाणिक व कार्यतत्पर नगरसेवक असावा

जनता की बात :  प्रभाग क्र. २६ - प्रामाणिक व कार्यतत्पर नगरसेवक असावा

नाशिक | निशिकांत पाटील

नगरसेवक Corporator हा अनुभवी, सुशिक्षित नागरिकांशी सुख-दु:खाशी एकरूप आणि समरस होणारा असावा. नगरसेवक आपल्या प्रभागाशी प्रामाणिक व कार्यतत्पर असावा honest and hard working Corporator.ज्या लोकांचे, नागरिकांचे, प्रभागातील रहिवाशांचे आपण लोकप्रतिनिधीत्व करतो, त्या लोकप्रतिनिधीची म्हणजेच नगरसेवकांची नेमकी कर्तव्ये काय आणि नेमके कोणते कार्य नगरसेवकाकडून अपेक्षित आहे, याचा विचार, चर्चा निश्चितच झाली पाहिजे.आपल्या शहराच्या भविष्यासाठी भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय घेणारा असला पाहिजे.तसेच 80% समाजकारण आणि 20% राजकारणात विशेष असे महत्वही असावे.

अभिजित सूर्यवंशी

प्रभागातील नगरसेवक हे सुसंस्कारी असावेत. ज्या भागातून ते उभे राहतात त्या भागातील जनतेच्या सुखदुःखात मदतीचा हात देणारे व वेळ देणारे असावेत. त्यांना विभागातील सदस्यांची माहिती बरोबरच प्रत्येक सामाजिक अडचणींची जाणीव देखील असावी व वेळोवेळी कामांची आठवण असावी. आळशी प्रवृत्ती नसून प्रगतीशील व्यक्तीच असावे. फक्त निवडणुकीपुरता न राहता त्यांनी प्रभागात महिन्यातून एक वेळा तरी जनतेची विचारपूस करुन प्रश्न सोडविण्याची जबाबदारी घ्यावी.त्याचबरोबर नगरसेवक हा स्वच्छ चारित्र्याचा असावा. महिलांशी सभ्यतेने वागून विशेषतः टवाळखोरीला प्राधान्य देणारा नसावा. भेदभाव न ठेवणारा, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून जनतेला लाभ मिळवून देणारा असावा. खर्‍या अर्थाने नगरसेवक श्रीरामा सारखा व नगरसेविका राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी ) यांच्यासारख्या असाव्यात.

विद्या पाटील

नगरसेवक त्या त्या प्रभागामध्ये अनुभवी,सुशिक्षित आणि साधारणपणे नागरिकांशी सुख-दु:खाशी एकरूप आणि समरस होणारा लोकप्रतिनिधी असावा.नगरसेवक आपल्या प्रभागाशी प्रामाणिक व कार्यतत्पर असावा. शहराच्या भविष्यासाठी भावी पिढीच्या हितासाठी दूरदृष्टी ठेवून काही धोरणात्मक निर्णय घेणारा असला पाहिजे.आपल्या प्रभागातील नगरपालिकेशी संबंधित अशा समस्यांची नगरसेवकाला माहिती व जाणीव असावी.नगरपालिकेच्या कायद्याची जाण असावी व समजही असावी.नगरपालिकेस निधी कसा उपलब्ध होतो आणि तो निधी कोणकोणत्या कारणासाठी खर्च करावा लागतो,याचेही ज्ञान नगरसेवकाला असावे.आपल्या शहरामध्ये पुढील 10 वर्षांचा धोरणात्मक दृष्टिकोन ठेवून कायमस्वरूपी कोणती कामे राबवावीत,याचाही अभ्यास सर्व नगरसेवकांना असणे अत्यंत आवश्यक आहे.कमीत कमी पैशात नगरपालिकेमार्फत जास्तीत जास्त सार्वजनिक काम कसे करून घेता येईल,याचाही नगरसेवकांनी जाणीव-पूर्वक प्रयत्न केला पाहिजे.

सुनील बेलदार

नागरिकांच्या मनपामार्फत ज्या दैनंदिन गरजा आहेत,त्या गरजांसाठी अभ्यासपूर्ण रितीने व कार्यक्षमतेने नियोजनबध्द असा कायमस्वरूपी कार्यक्रम आखून देणे हे नगरसेवकांचे महत्वाचे काम आहे.महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव आणि विविध सार्वजनिक कारणांसाठी म्हणजे खेळाची मैदाने, प्रदूषण टाळण्यासाठी मोठमोठी उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे,भाजी मंडई यासाठी स्वच्छ व सर्वसोयींनी-युक्त अशी अद्यावत मार्केटस या सुविधांची टंचाई आहे.नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन राबवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे हे देखील नगरसेवकांचे आद्य कर्तव्य आहे.नागरिकांच्या करमणुकीसाठी अद्यावत टाऊन हॉल, नाट्य मंदिर असणे तसेच विविध कलागुणांना वाव देण्यासाठी थिएटर अगर कला मंदिर असणे आणि त्या दृष्टीने पाठपुरावा नगरसेवकांनी केला पाहिजे.महानगरपालिकेमार्फत सार्वजनिक हिताची विकासकामे करताना ती टक्केवारीशिवाय झाली पाहिजेत आणि कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे झाली पाहिजेत.

अतुल आहिरे

Related Stories

No stories found.