जनता की बात : प्रभाग क्र. २४- नवनवीन योजना आखणारा नगरसेवक असावा

जनता की बात : प्रभाग क्र. २४- नवनवीन योजना आखणारा नगरसेवक असावा

नाशिक | फारुख पठाण Nashik

प्रभागातील नगरसेवक Corportor हा सुशिक्षित असावा तसेच त्या नगरसेवकाला नागरिकांच्या मूलभूत समस्या The basic problem माहीत असाव्यात. प्रभागातील अनेक परिसरांमध्ये टवाळखोरांकडून महिलांची छेड काढण्यात येते तसेच सोन साखळी चोरांचा देखील उद्रेक वाढतो आहे त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे. आपल्या प्रभागांमध्ये रोज फेरफटका मारावा. कोविड काळामध्ये कोणताही नगरसेवक प्रभागात आलेला आढळून आलेला नाही आणि नगरसेवकाने आपल्या प्रभागातील जनतेच्या काळजीपोटी काहीही मदत केलेली नाही. त्यामुळे गरजेच्या वेळी नगरसेवकाने प्रभागातील जनतेसाठी धाव घेतली पाहिजे.

स्वाती चौधरी

खरोखरच जनसेवा करणार्‍याने नगरसेवक व्हावे.ज्या भागातून तो उभा राहतो त्या भागातील जनतेच्या सुखदुःखात तो धावून येणारा व वेळ देणारा असावा.धन नको पण तन आणि मन देणारा असावा. तो मतांपुरता गल्लीबोळातून फिरणारा नसावा.नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यात तो जागरूक असावा. निवडणुका वगळता त्याने प्रभागात महिन्यात एकदा तरी जनमेळावा घ्यावा व लोकांच्या अडचणी समजावून घेऊन पाठपुरावा करावा. नगरसेवक कितीही मताने येवो पण त्याने शंभर टक्के लोकांना सेवा द्यावी.तो भेदभाव ठेवणारा नसावा.जनतेसाठी नवनवीन योजना येतात त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अग्रक्रमाने करणारा असावा.

रामदास आत्माराम शिंपी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक

स्वच्छ चारित्र्य, विभागातील समस्यांची माहिती असणारा , नागरिकांना होणारा त्रास आपल्यालाही होतो याची जाणीव असणारा नगरसेवक असावा.सरकार झोपडपट्ट्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवते. त्या बाबत नगरसेवकाने नेहमी अपडेट राहिले पाहिजे. त्या योजना आपल्या भागात राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.स्वच्छ चारित्र्याचा व प्रामाणिक, भरपूर मेहनत करण्याची तयारी असलेला, एकदा निवडून आल्यानंतर जनतेचा विचार करणारा, नगरसेवकाच्या अधिकाराची, तसेच जबाबदारीची सुध्दा जाणीव असणारा. कामकाजाची चांगली माहिती असणारा.सुशिक्षित आणि साधारणपणे नागरिकांशी सुख-दु:खाशी एकरूप आणि समरस होणारा लोकप्रतिनिधी असावा. तसेच 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा असावा.

पुष्कराज दंडगव्हाणे

कुठल्याही सामाजिक दर्जाच्या पदावर काम करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या व्यक्तीला लोकांचे प्रश्न सोडविण्याची मनापासून तळमळ असली पाहिजे. समाजसेवा म्हणजे काय, याचे बाळकडू त्याच्या अंगात भिनलेले पाहिजे. ज्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यास सामान्य नागरिकाला त्याच्या नोकरी-धंद्याच्या व्यस्ततेमुळे वेळ नसतो, तिथे नगरसेवकाने पूर्ण वेळ दिला पाहिजे. उमेदवार शिकलेला असावा किंवा नाही यावर दुमत असू शकेल, पण निश्चितच निवडून आलेल्या उमेदवारात काही जीवनविषयक मूल्ये असावीत.प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, चिकाटी, जनतेच्या पैशाला विश्वस्त म्हणून न्याय देण्याची क्षमता त्याच्यामध्ये हवी. शिक्षण असो किंवा नसो नगरसेवकाकडे वेळेचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट असलेच पाहिजे.नगरसेवक ह्या शब्दाचा मुळात अर्थ म्हणजे जनतेचा सेवक असतो, प्रभागाची सेवा ही त्याची मूळ सेवा असावी.

सोनू पालकर

Related Stories

No stories found.