जनता की बात : प्रभाग क्र. २१- स्थानिक व उच्चशिक्षित नगरसेवक असावा

जनता की बात :  प्रभाग क्र. २१-  स्थानिक व उच्चशिक्षित नगरसेवक असावा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आमच्या प्रभागात निवडून येणारा नगरसेवक Corporator अथवा नगरसेविका उच्चशिक्षित तसेच जनतेचे मूलभूत प्रश्न मार्गी लावणारा असावा. काही नगरसेवक निवडून आल्यानंतर ते पुन्हा प्रभागाच्या परिसरात काय समस्या आहेत याकडे लक्ष देत नाहीत.प्रभागात नियमित फिरणारा नगरसेवक असावा. लोकांच्या समस्या नगरसेवकाने जाणून घ्याव्यात. जो लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करेल त्याच्याबरोबर जनता राहील. त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिकांना वेळोवेळी मदत करणारा नगरसेवक असावा. मतभेद किंवा पक्षभेद करणारा नगरसेवक नसावा.

प्रेरणा जाधव

नगरसेवकाला सामाजिक बांधिलकीची जाण असली पाहिजे. नगरसेवक हा स्थानिक रहिवासी असावा,जेणेकरून त्याला प्रभागाचा संपूर्ण अभ्यास व समस्याची माहिती असली पाहिजे. नगरसेवकांनी पुढाकार घेऊन बेरोजगार तरुणांंसाठी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे.नागरिकांच्या दैनंदिन समस्यांविषयी जाण असली पाहिजे, असा नगरसेवक असावा.

- चेतन चंद्रमोरे

नगरसेवक फक्त नावापुरता नसावा. लोकांच्या सुखा-दुखात धावून जाणारा असावा. तरुणांसाठी व्यायामशाळा, सुसज्ज वाचनालय, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांंकरीता खेळण्यासाठी उद्यान,लाईट,पाणी, रस्ते आदी सुविधा देणारा नगरसेवक असावा.

- अजय जवरे

प्रत्येक प्रभागाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु काही ठराविक नगरसेवक ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी जास्त लक्ष देतात .परिणामी इतर भागातील विकास खुंटतो. त्यामुळे प्रभागाच्या प्रत्येक भागात नगरसेवकांनी लक्ष दिले पाहिजे, नगरसेवक हा तेथील नागरिकांच्या समस्या सोडवणारा असला पाहिजे .नगरसेवकांनी प्रत्येक नागरिकांशी संपर्क साधला तर नागरिकांच्या समस्याही नगरसेवकाला समजतात.त्या समस्या नगरसेवकाला सोडवता येईल. नगरसेवक हा अभ्यासू व स्पष्ट बोलणारा असावा.

- लंकेश गाडेकर

Related Stories

No stories found.