जनता की बात : प्रभाग क्र. २० - आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणारा नगरसेवक असावा

जनता की बात : प्रभाग क्र. २० - आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणारा नगरसेवक असावा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रभागात निवडून येणारा नगरसेवक Corporator पुरुष असो किंवा महिला तो जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून असतो. मात्र अनेक ठिकाणी नगरसेवक स्वतः काम न करता त्यांच्याऐवजी दुसरेच काम करत असतात. त्यामुळे खरा नगरसेवक कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो. नगरसेवकाने निवडून आल्यानंतर जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम करावे, जेणेकरून जनता आपल्या अडीअडचणी त्यांना सांगू शकेल व नगरसेवकाने जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. नगरसेवक हा प्रभागातील जनतेच्या सुख-दुःखाच्या कार्यक्रमात मिसळणारा पाहिजे तसेच जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणारा pays attention to health issues नगरसेवकास असावा.

शेखर फडताळे

नगरसेवक निवडणूक होण्यापूर्वी जनतेला अनेक आश्वासने देत असतात. परंतु निवडून आल्यानंतर जनतेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नगरसेवकाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणारा नगरसेवक असावा. प्रभागाचा विकास कसा होईल, याकडे नगरसेवकाने प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभागात किमान तीन ते चार ठिकाणी संपर्क कार्यालय उघडले पाहिजे. त्यामुळे जनता व नगरसेवक यांचा संबंध कायम राहू शकतो. आठवड्यातून एक वेळा नगरसेवकाने मतदारांशी संपर्क साधावा. त्यामुळे जनतेचे प्रश्न समजू शकतील.

रवी कुलथे

प्रभागातून जो कोणी नगरसेवक निवडून येईल तो जनतेचे भले करणारा नगरसेवक असावा. विकासकामांबरोबरच जनतेच्या मूलभूत समस्या सोडवणार्‍या नगरसेवकाला प्रभागातील नागरिकांनी निवडून द्यावे. निवडून आल्यानंतर नगरसेवकाने प्रथम प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करावा. कारण नगरसेवक निवडून गेल्यानंतर जनतेला पुन्हा आपला मुखवटा दाखवत नाही. त्यामुळे प्रभागात नगरसेवक आहे की नाही, असा प्रश्न जनतेला पडतो. त्यामुळे नगरसेवकाने जनता हेच खरे मतदार आहे, असे समजून जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे. असे केल्यास नागरिक नगरसेवकाला धन्यवाद देतील. त्यामुळे नगरसेवक हा जनतेच्या मनातील व त्यांच्या अडीअडचणी सोडवणारा असावा.

विनीत सातपुते

निवडून येणारा जो कोणी नगरसेवक असेल तो जनतेच्या नेहमीच संपर्कात असणारा असावा तसेच नगरसेवक हा अभ्यासू व त्याला कायद्याचे ज्ञान असावे. त्याचप्रमाणे जनतेच्या समस्यांचा व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवकाने महासभा व प्रभाग समितीच्या बैठकीत आवाज उठविला पाहिजे. आवाज उठविला तरच प्रभागातील विकासकामे होतील, असा नगरसेवक नागरिकांनी निवडून दिला पाहिजे. प्रभागातील आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणारा नगरसेवक असावा.

प्रवीण निकम

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com