जनता की बात : प्रभाग क्र. १९ - जबाबदारीची जाणीव असणारा नगरसेवक पाहिजे

जनता की बात :  प्रभाग क्र. १९ - जबाबदारीची जाणीव असणारा नगरसेवक पाहिजे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

निवडून येणारा नगरसेवक coroporator हा स्थानिक ठिकाणी राहणारा असावा. काही पक्षांतर्फे पक्षाची उमेदवारी देताना नेते स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून दुसर्‍यांना उमेदवारी देतात. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यावर अन्याय होतो. परिणामी निवडून आलेला नगरसेवक विकास कामांकडे Devlopment works लक्ष देत नाही. त्यामुळे प्रभागाचा विकास होत नाही. याकरिता प्रभागाची माहिती असणार्‍या व तिथल्या समस्यांची जाणीव असणारा स्थानिक नगरसेवकच निवडून आला पाहिजे जेणेकरून तो प्रभागाच्या समस्याकडे व नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देणारा असावा.

विशाल सांगळे

नगरसेवक निवडून आल्यानंतर त्याने प्रथमता प्रत्येक घरोघरी जाऊन येथील नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यामुळे त्याला प्रत्येक मतदारांची नावे व माहिती मिळू शकते. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यावर महिन्यातून एक वेळेस प्रभागातील प्रत्येक भागात नागरिकांच्या मिटिंग घेऊन त्यांच्या समस्यांची Problems in the ward माहिती करून घ्यावी. त्यामुळे प्रभागातील काय समस्या आहेत या नगरसेवकाला समजू शकतात व प्रभागाचा विकास होण्यासही मदत होईल. त्यासाठी नेहमी नागरिकांच्या संपर्कात राहणारा नगरसेवकच निवडून द्यावा.

गौरव आभाळे

आतापर्यंत अनेक नगरसेवक निवडून आले. निवडून येण्यापूर्वी प्रभागात जनतेला कामे करण्याचे आश्वासन देतात. परंतु निवडून आल्यानंतर मात्र सर्व जण विसरून जातात त्यामुळे जनतेने यापुढे असा नगरसेवक निवडून द्यावा की सांगितलेले काम नगरसेवकांनी केले पाहिजे तरच प्रभागाचा विकास होऊ शकतो. नगरसेवक हा सर्व नागरिकांचा प्रतिनिधी असतो नगरसेवकाने विरोधकांनाही सोबत घेऊन काम करावे.

निखिल भागवत

नगरसेवकांची प्राथमिक भूमिका त्यांचा प्रभाग आणि त्यामध्ये राहणार्‍या लोकांचे प्रतिनिधित्व करणे.नगरसेवक हा स्वच्छ चारित्र्याचा निर्व्यसनी व प्रामाणिक हवा. आपल्या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी झटणारा आणि निवडून आल्यानंतर पक्षभेद न करता तसेच श्रीमंत व गरीब असा भेदभाव न करता सर्वांची कामे करणारा व नागरिकांचे समस्याचे निरसन करणारा व त्यांचे प्रश्न सोडवणारा,आपल्या जबाबदारीची जाणीव असणारा व कामकाजाची चांगली माहिती असणारा असावा.

अक्षय आवारे

Related Stories

No stories found.