जनता की बात : प्रभाग क्र. १८ - सभागृहात आवाज उठवणारा नगरसेवक असावा

जनता की बात :  प्रभाग क्र. १८ - सभागृहात आवाज उठवणारा नगरसेवक असावा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रभागात संमिश्र लोकवस्तीचा भरणा असल्याने सर्वांना सोबत घेऊन विकास साधणारा लोकप्रतिनिधी Corporator हवा. वाढता परिसर लक्षात घेता प्रभागातील सामाजिक व मूलभूत समस्यांची अचूकपणे सोडवणूक करणारा जाणकार व अभ्यासू नगरसेवक असावा. युवापिढीसाठी काहीतरी करून दाखवणारा व रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या लोकप्रतिनिधीची प्रभागात नितांत गरज असून समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वांगीण विकास साधणारा लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे.

आकाश कुमावत

भरकटलेल्या युवकांना योग्य मार्गावर आणून त्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या लोकप्रतिनिधीची प्रभागात गरज आहे. केवळ निवडणुकीपुरते कार्यकर्त्यांना जवळ घेऊन फिरणारे लोकप्रतिनिधी पाच वर्ष गायब होतात, ही बाब ओळखून राजकारणाला नवा आयाम देणारा नगरसेवक असावा. अभ्यास, समस्यांची जाण आणि ती सोडवण्यासाठी सभागृहात दमदार बाजू मांडणारा हुशार नगरसेवक असावा.

सागर गायकवाड

प्रभागातील नगरसेवक जनतेप्रती निष्ठावान असावा. निवडणूक लढवताना जो जाहीरनामा Manifesto while contesting elections प्रसिद्ध केला होता, त्यातील काही अडचणी पूर्णपणे सुटू शकणार नाहीत. किंबहुना त्या सोडवण्यासाठी पाठपुराव्याचे प्रयत्न करून नागरिकांमध्ये विश्वास जागृती करणारा असावा. आज केलेले प्रयत्न नक्कीच पुढे फलद्रूप होतील, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करणारा असावा. प्रभागातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरातील सदस्य समजून त्याची काळजी घेणारा, अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणारा, हाच जनसेवक नागरिकांच्या पसंतीस उतरतो.

अभिजित निरगुडे

प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, वयोवृध्द महिला, युवा यांना आधार प्रदान करणारा असावा. ज्येष्ठांना या वयात दोन आधारपूर्ण संवेदन प्रदान करणारे बोल हवे असतात. पडत्या काळात विचारपूस कोणाला नको असते? तसेच प्रभागात युवा वर्गासाठी निरनिराळ्या रोजगार संधी निर्माण करणारा असावा. सन्मार्ग, सहनशीलतेने जीवन कशा प्रकारे व्यतीत करता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी युवा वर्गाला दिल्यास हे कार्य जर जनसेवकाने केले तर नक्कीच ङ्गयुथ आयकॉनफ म्हणून त्याला नावलौकिक मिळवता येईल.

सागर पवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com