जनता की बात : प्रभाग क्र. १६- जनतेच्या संपर्कातील नगरसेवक पाहिजे

जनता की बात : प्रभाग क्र. १६- जनतेच्या संपर्कातील नगरसेवक पाहिजे

नाशिक | फारुख पठाण

महिला असो की पुरुष नगरसेवक Corporator काम करणारा हवा. निवडणूक आल्यावरच दिसणारा नसावा. कायम लोकांच्या संपर्कात राहणारा नगरसेवक हवा. घरोघरी जाऊन समस्या विचारणारा नगरसेवक हवा. प्रभागात शांतता हवी. नगरसेवक शिक्षीत व अभ्यासू असावा. प्रभागात सुरू असणार्‍या अवैध धंद्यांविरुध्द आवाज उठवून त्यांना हटवणारा पाहिजे. अशा प्रकारच्या अवैध कामांमुळे बाहेरचे टवाळखोर मंडळी प्रभागात जमतात, यामुळे सुरक्षेला कुठेतरी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्यानांमध्ये बाहेरचे लोक येतात यामुळे स्थानिकांना त्रास होतो, याकडे लक्ष देणारा नगरसेवक पाहिजे.

अविनाश उघाडे

नाशिक महापालिकेची NMC माहितीसह प्रभागातील बारीक-सारीक माहिती ठेवणारा शिक्षीत, तरुण तडफदार स्थानिक नगरसेवक असावा.नगरसेवक फक्त नावापुरता नसावा, लोकांच्या सुखदुखात धावून जाणारा असावा. मागील दोन वर्षात करोनामुळे लोक हैराण झाले आहे. अशा वेळी लोकांना धीर देणारा व आरोग्य सुविधा उत्तमरित्या पोहोचवणारा नगरसेवक असावा. सतत संपर्कात राहणारा नगरसेवक असावा.

निलेश सहाणे

सध्या महिला सुरक्षित नसल्याचे वातावरण आहे. महिलांना सुरक्षा देणारा नगरसेवक असावा. ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात किंवा स्वतंत्र ठिकाणी बसण्याची सोय करुन देणारा नगरसेवक असावा. महिलांच्या अपेक्षा पुणर्र् करणारा नगरसेवक हवा. प्रभागातील नागरिकांच्या संकटाच्या वेळी रात्रीबेरात्री धावणारा नगरसेवक हवा.

माधुरी गांगुर्डे

नगरसेवक हा प्रभागात फिरणारा, लोकांच्या समस्या People's problems जाणून घेऊन त्यावर उपाय काढणारा हवा. प्रभागात काय चालू आहे व काय बंद याकडे विशेष लक्ष देणारा हवा. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच लहान मुलांसाठी देखील काम करणारा नगरसेवक हवा. अवैध धंदे बंद करणारा व रिकाम्या हाताला काम देणार्‍या नगरसेवकाची गरज आहे.

कुणाल साबळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com