जनता की बात : प्रभाग क्र. १२- रविवार कारंजाचे सौंदर्य टिकवा

जनता की बात : प्रभाग क्र. १२- रविवार कारंजाचे सौंदर्य टिकवा

नाशिक | नरेंद्र जोशी Nashik

नाशिक महापालिकेने NMC स्मार्ट सिटीची Smart City कामे करतांना ती पूर्ण केली पाहिजे.अर्धवट सोडून देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो. ते शहराच्या स्वच्छ व सुंदरतेला गालबोट लावते. किमान रस्त्यावर वाहत येणारे पाणी तरी थांबविले गेले पाहिजे.

गणेश वैश्य

रविवार कारंजा Ravivar karanja हे नाशिक शहराचे नाक आहे. येथील सौंदर्य टिकलेच पाहिजे. येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यशवंत मंडई पाडून तेथे बहुमजली पार्किंगचा विचार महापालिकेने केल्यास बरेच प्रश्न निकाली निघतील.शहर स्मार्ट करत असतांना स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज आहे.

नरेंद्र पवार

रविवार कारंजापासून सराफ बाजारापयर्ंंत मेनरोड हा सतत गजबजलेला परिसर आहे. येथेे वाहनांना शिस्त लावणे गरजेचे आहे. येथील भाजी बाजार घास बाजारात हलवला किंंवा पार्किंगची व्यवस्था गंगाघाटाकडे केली तरी बरेच प्रश्न सुटतील. येथील रिक्षा थांब्याला शिस्त लावणे गरजेचे आहे.

गिरीश हिरे

अशोक स्तंभापासून रविवार कारंजापयर्ंंत रविवार पेठ हा पुण्यातील लक्ष्मी रोडच्या धर्तीवर चांगला विकसीत करता येऊ शकतो. त्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा विचार करणे गरजेचे आहे. रविवार पेठ व रविवार कारंजा येथील गर्दीवर नियंत्रण येण्यासाठी वाहतुकीला शिस्त गरजेचीे आहे.

हेमंत बोरा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com