जनता की बात- प्रभाग क्र. १ : प्रभागाचा विकास करणारा नगरसेवक असावा

जनता की बात- प्रभाग क्र. १ :   प्रभागाचा विकास करणारा नगरसेवक असावा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पुढील दृष्टीकोन ठेऊन कामे झाली पाहिजेत Devlopment works .ज्यात बगीच्यांचे संगोपन, त्यात लावण्यात आलेल्या खेेळण्यांची देखभाल,व्यायामाचे साहित्य, वाचनालय यासाठी ज्या सरकारी जागा आहे त्याठिकाणी बांधकाम करण्यात यावे. पाणीपुरवठ्याबाबत आज काही ठिकाणी पाणी येते तर काही ठिकाणी येत नाही त्यामुळे सगळीकडे समान पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी धाऊन येणारा व नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी कटीबध्द असणारा नगरसेवक असावा.

- खंडेराव वाघ, ज्येष्ठ नागरिक

महिलांच्या संरक्षणासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. महिला सकाळी, सायंकाळी फिरायला जातात त्यावेळी त्यांच्या गळ्यातील मंगसुत्रे पळविण्याचे प्रकार वाढले आहेत ते रोखण्याचे काम झाले पाहिजे. शहरात ठिकठिकाणी रस्याची कामे केली जात आहेत. त्याचा कुठेतरी त्रास हा जनतेला होतो. कधी कधी रात्री लाइट बंद असतात. सकाळी सायंकाळी ज्या वेळेस महिला वॉकिंग साठी जातात त्यावेळेला पोलिंसांनी गस्त वाढविल्यास मंगळसुत्र चोरिच्या घटना टाळता येतील.

- लीना पाटील, गृहिणी

आगामी काळातील नगरसेवकांनी वॉर्ड, प्रभाग व्यवस्थित कसे राहतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रगात जी काही रस्त्यांची कामे बाकी आहेत ती कामे तातडीने पुर्ण करण्यात आली पाहिजे. जे रस्ते पुर्ण झाले आहेत त्यांची देखभाल करावी. प्रभागात स्टेडियमचे काम प्रस्तावित आहे ते काम कसे मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करावेत. त्याच प्रमाणे आपल्या प्रभागात होत असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचलावित हीच अपेक्षा.

- रणजित गांगोडे, नागरिक

नविन निवडून येणार्‍यांकडून स्टेडियम, लाईट, रस्ते,नळपाणी पूरवठा याची कामे झाली पाहिजेत. नागरिकांना अपेक्षित असलेला प्रभागाचा विकास व्हावा व त्याच्या अपेक्षांची पुर्तता व्हावी.

- वसंत महाले,नागरिक

येणार्‍या नगरसेवकांनी प्रभागात पाणी,रस्ते, विज या मुलभुत सुविधांची काळजी घेऊन या सुविधा पुरविण्यात याव्यात. ज्येेष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जीम,लहान मुलांसाठी अंगणवाडी, उद्याने त्यात योग्य ती खेळणी बसवावी. प्रभागात नियमित साफसफाई व्हावी. त्याच बरोबर प्रभागात समाज मंदिर बांधावे जेणे करून प्रभागातील नागरिकांना छोटे मोठे कार्यक्रम घेण्यास मदत होईल. पर्यावरणाच्या दृष्टीन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे. - रविकांत खैरनार, युवक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com