जनता की बात - प्रभाग क्रमांक ८ : सार्वजनिक सुविधांसाठी प्रयत्न होणे गरजेचे

जनता की बात - प्रभाग क्रमांक ८ : सार्वजनिक सुविधांसाठी प्रयत्न होणे गरजेचे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उच्चभ्रू वसाहतीसह मध्यमवर्गीय व शेतकरी बांधवांसाठी प्राथमिक सुविधा पुरवाव्यात ही नागरिकांची (Citizens) प्रमुख मागणी (Demand) आहे. या परिसरात सार्वजनिक सेवा सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले...

आनंदवल्ली (Anandavalli) गावातील मनपा शाळेजवळील मार्केट हे अनेक वर्षांपासून वाटपाविना पडून आहे. ते तातडीने सुरू करण्यात यावे. लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच आजी आजोबांना फिरण्यासाठी उद्यान (Garden) व क्रीडांगण (Playground) विकसित करावे. तसेच गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली व्यायामशाळा (Gym) व समाज मंदिर सील करण्यात आले आहे. ते तातडीने सुरू करण्यात यावे.

विष्णू भिमराव शिंदे, आनंदवल्ली

आनंदीबाईची गढी हा पुरातन वारसा आहे. त्याचे जतन होणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) मागच्या बाजूच्या कॉलनीतील सर्वच रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच व्यायामशाळा सुरू करण्यात यावी.

धोडीराम सयाजी गलांडे

पाइपलाईन रोडवर भाजी बाजार बसवण्यात आलेला आहे. त्याठिकाणी प्राथमिक सुविधांची वानवा आहे. त्याठिकाणी बंदिस्त मार्केट उभारण्यात यावे. तसेच त्याठिकाणी वीजपुरवठा (Power supply) करणे, स्वच्छतागृह बांधावे, पाईपलाइन रोड व कॅनाल रोडच्या चौफुलीवर सिग्नलची गरज आहे. तो तातडीने उभारण्यात यावा.

ज्ञानेश्वर डंबाळे, फळ विक्रेता

आगामी निवडणुकीत (Election) नागरिकांनी स्वच्छ चरित्राच्या नगरसेवकांना (Corporator) निवडून द्यावे. गोड बोलून जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष करणारा नगरसेवक नसावा, निवडणुकीच्या निमित्ताने नमस्कार करुन चमत्कार करणारा नसावा. जनतेच्या सुख दु:खात सहभागी होणारा असावा.

रमेश कडलग, वनविहार कॉलनी

Related Stories

No stories found.