जनता की बात - प्रभाग क्रमांक ७ : सुख दु:खात धावणारा नगरसेवक असावा

जनता की बात - प्रभाग क्रमांक ७ : सुख दु:खात धावणारा नगरसेवक असावा

नाशिक | राजेंद्र सूर्यवंशी | Nashik

कोविडचा (Covid19) प्रभाव लक्षात घेता आगामी काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रभागात चांगले कोविड सेंटर (Covid Center) उभारण्यात यावे. त्याचबरोबर सुरू असलेली लसीकरण मोहीम सक्षमतेने राबवावी. युवकांसाठी वाचनालयाच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी काही मार्गदर्शन करता येईल का? याकडे लक्ष द्यावे.

प्रभागातील खेळाडूंसांठी चांगले स्पोर्ट हब (Sports Hub) झाल्यास खेळांडूना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळून त्यांना राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होता येईल. रस्ते तसेच वाहतुकीचा प्रश्न आहे. वाहतूक (Traffic) नियंत्रणासाठी पोलिसांच्या (Police) मदतीने काही उपाययोजना केल्या तर नक्कीच वाहतुकीचा प्रश्न सुटू शकेल.

प्रदिप रणधीर, रहिवासी.

आगामी लोकप्रतिनिधींकडून जास्त काही अपेक्षा नाहित. मात्र सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा. प्रभागात अनेक युवक बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वसामान्यांच्या जास्त काही अपेक्षा नसतात, फक्त रस्ते (Roads), पाणी (Water), लाईट (Light) अशा मूलभूत सुविधांकडे जास्त लक्ष देण्यास प्राधान्य देण्यात यावे. घंटागाडी वेळेवर आली पाहिजे जेणे करून प्रभागात स्वच्छता राहिल.

हर्षल पाटील, युवक

खूप अपेक्षा नाही. सर्वसामान्य माणूस नगरसेवकांना (Corporator) निवडून देत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मदतीला धावणारा नगरसेवक असावा. मदत म्हणजे काही आर्थिक प्रकारची नको आहे. परंतू गरजेच्यावेळी धीर देण्यासाठी पुढे आले पाहिजे. जनतेसाठी कायम उपलब्ध असायला हवा,त्यांचा फोन कधीही बंद नसावा, जनतेच्या सुख दु:खात धावणारा असावा. संकटकाळी धावतो, जनतेला मदत करतो तोच खरा नगरसेवक होय.

संजय घोडके, नागरिक.

महिलांसाठी (Women) आरोग्य सुविधा (Health facilities) उपलब्ध करण्यात याव्यात. रस्यावरून जाताना महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे जे काही प्रकार होत आहेत त्यासाठी सोनसाखळी चोरांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांच्या मदतीने उपाययोजना राबविण्यात याव्यात जेणे करून महिला रस्त्यांवर फिरताना त्यांच्या मनातील भीती दूर होईल. त्याचप्रमाणे प्रभागात स्पोर्ट हब झाल्यास महिलांतील क्रीडा गुणांना वाव मिळेल.

अर्चना रणवीर, गृहिणी.

नगरसेवक सुसंकृत, सुशिक्षीत असावा. त्याचबरोबर जनतेच्या मदतीसाठी धावणारा तसेच जनतेला त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती करणारा असावा आणि आमच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.

अभिजीत शहाणे, युवक.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com