<p><strong>नवीन नाशिक | प्रतिनिधी </strong></p><p>गेल्या वर्षी आजच्याच दिवशी करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रात अवघ्या ६७ रुग्णांची संख्या होती. भारतात करोनाचे गांभीर्य बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. या घटनेला सबंध भारत वासीयांनी पाठिंबा दिला होता. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या लॉकडाऊन काळात न भूतो ना भविष्यती असा अनुभव सर्वांनाच आला. आता कशीबशी सर्व परिस्थिती सुरळीत होत असतांना रुग्ण संख्या मात्र वाढत आहे. नाशिक पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करीत तर नाही ना अशी भीती अनेकांच्या तोंडून ऐकण्यास मिळत आहे. याबाबत दैनिक देशदूतने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी केलेली चर्चा</p>.<p>नवीन नाशिक प्रतिनिधी : करोना विषाणूचा भारतात शिरकाव झाला त्याचे गांभीर्य बघता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी स्वइच्छेने देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. समस्त भारत वासीयांनी त्याला पाठिंबा दिला. त्याला आता वर्ष पूर्ण झाले. या लॉकडाऊन काळात न भूतो ना भविशंती असा अनुभव सर्वांनाच आला. आता कशीबशी सर्व परिस्थिती सुरळीत होत असतांना रुग्ण संख्या वाढत असल्याने नाशिक पुन्हा लॉकडाऊन च्या दिशेने वाटचाल करीत आहे. याबाबत दैनिक देशदूत ने नागरिकांशी केलेली चर्चा</p>