सर्वतीर्थ टाकेदमध्ये जनता कर्फ्यू; व्यापारी करोनाबाधित आढळून आल्यास व्यवसाय राहणार बंद

सर्वतीर्थ टाकेदमध्ये जनता कर्फ्यू; व्यापारी करोनाबाधित आढळून आल्यास व्यवसाय राहणार बंद

सर्वतीर्थ टाकेद | शाहबाज शेख

सर्वतीर्थ टाकेद येथे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी टाकेद बु गाव पूर्ण पणे बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते. या आवाहनास पाठींबा देत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आणखी दोन दोन म्हणजेच येत्या बुधवारपर्यंत हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

बंद काळात मेडिकल व दवाखाने वगळता संपुर्ण गाव बंद चा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत मार्फत गावातून दवंडी ही देण्यात आली. गाव बंद काळात सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून मगच दुकाने उघडायची आहेत असेही आवाहन याप्रसंगी करण्यात आले होते. तसेच कोणी व्यापारी बफ्हीत आढळून आल्यास त्या दुकानदारांचे दुकान पुढील चौदा दिवस बंद ठेवण्यात येईल असेही ग्रामपंचायतीने जाहीर केले होते.

बंद काळात जिल्हा प्राथमिक शाळा टाकेद शिक्षक वर्ग व न्यू इंग्लिश स्कूल टाकेद चे शिक्षक हे आपली ड्युटी बजावत आहेत. या वेळी आशा सेविका व अंगणवाडी सेविका हे ही घरो घरी जाऊन प्रत्येक ग्रामस्थांच्या तब्बेतीची विचारपूस करीत आहेत.

आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. या वेळी संपूर्ण ग्रामस्थांनी आशा सेविका , शिक्षक वर्ग व अंगणवाडी सेविका यांचे आभार ही मानले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com