गणेशा
गणेशा
नाशिक

जानोरीकर यंदा गणेशाची आरती एकाचवेळी करणार

जानोरी करांचा निर्णय

Gokul Pawar

Gokul Pawar

जानोरी । Janori

करोना पार्श्वभुमीवर गणेशोत्सव सर्वांनी घरातच गणपतीची मूर्ती सार्वजनिक स्वरूपात न स्थापित करता आपापल्या घरीच गणेश मूर्तीचे स्थापना करण्याचे ठरविले. रज संध्याकाळी सर्व गावातील कुटुंबांनी 8 वाजून 5 मिनिटांनी एकाच वेळी आरती करून या करण्याचा नायनाट व्हावा यासाठी गणरायाकडे साकडे घालण्याचे आवाहन जानोरी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

सालाबादाप्रमाणे गणेशोत्सवाच्या आधी दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने जानोरी येथे बैठक आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली जानोरी मध्ये गणेशोत्सव मंडळ यांची बैठक संपन्न झाली. यावेळी जानोरी गावात सार्वजनिक मूर्ती कोणीही न बसवता सर्वांनी आपापल्या घरीच गणपतीची मूर्ती स्थापित करायची असून रोज संध्याकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी एकाच वेळी सर्व गावात आरती करण्याचे ठरविण्यात आले. यामुळे एक आगळा वेगळा उपक्रम जानोरी गावाने राबविण्याचे योजित केले आहे. सर्वांच्या मनोकामनेतून या कोरोनाचा नायनाट होईल अशी अपेक्षा जानोरीकरांनी व्यक्त केले आहे.

जानोरीकरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनी स्वागत केले आहे. तालुक्यात इतर गावांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी माजी जि. प. सदस्य शंकरराव काठे, सरपंच संगीता सरनाईक उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील सुरेश घुमरे, ग्रा.पं.सदस्य शंकरराव वाघ यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या पारंपारिक उत्सवांवर बाधा आली असून त्यामुळे शासनाने निर्बंध घालून दिलेल्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करायचा आहे. या अनुषंगाने आज जानोरी गावात बैठक घेतली असता सार्वजनिक मूर्तीची स्थापना न करता सर्वांनी आपापल्या घरातच मूर्तीची स्थापना करून सगळ्यांनी रोज संध्याकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी एकत्र आरती आपापल्या घरात करण्याचे ठरवले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून तालुक्यातील इतर गावांनीही याचा आदर्श घेणे आवश्यक आहे.

- अनिलकुमार बोरसे, पोलिस निरीक्षक, दिंडोरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com