जानोरीतील जगदंबा माता आणि जत्रा

जानोरीतील जगदंबा माता आणि जत्रा

नाशिक प्रतिनिधी | nashik

जगदंबा मातेचा इतिहास (History of the janori villege deity jagdamba mata) हा खूप जुना सोळाव्या शतकातील शिवकालीन इतिहास मानला जातो. १५ जून २०१२ रोजी जगदंबा माता मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न झाला, यावेळी कलशारोहन जनार्दन स्वामींचे शिष्य प.पु श्री. जेनेश्वर महाराज व प. पु. श्री.सेवा गिरी महाराज यांच्या हस्ते झाले. दिंडोरी (Dindori) तालुक्यातील जानोरी (Janori) हे गाव खेडेगाव असून या गावातील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात....

हे फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसच नाही तर इतर वेळेलाही जगदंबा मातेच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात व नवस करत असतात.

जगदंबा माता मंदिरामुळे आता जानोरी गावं ओळखले जाते. देवीचा बाजार म्हणून या गावात अनेक जण मोठ्या उत्साहाने तयारी करत असतात. (Weekly Market) मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तू चे दुकान हे छोट्या छोट्या घरासमोर लावले जाते व याचा आनंद अनेक ठिकाणाहून येणारे लोकं हे जानोरी गावातील बाजाराचा घेत असतात.

शुक्रवार हा देवीचा वार असल्याने इथे देवीचा बाजार असे म्हंटले जाते. यादिवशी मोठ्या प्रमाणात जत्रा गावकरी वर्ग भरवतात. या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी व जत्रेचा आनंद घेण्यासाठी अनेक गावातील लोक येथे येतात. सध्याच्या वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे ग्रामीण जीवन हे अनेकांना अनुभवता येत नाही व गावातील अनेक गोष्टी या त्यांच्या भाषेत जुन्या व गावठी वाटतात.

पण जानोरी गावातील अनेक गोष्टींचा अभिमान वाटावा असे बरेच काही सण उत्सव हे परंपरे ने साजरे केले जातात. जानोरीतील जगदंबा मातेचे मंदिर इतके प्रसन्न असून पाठ, पूजा, आरती हे नऊ दिवस तर असतेच पण रोज ही आरती व देवीची भक्ती मोठ्या उत्साहाने जानोरी गावात होताना दिसते.

जानोरी गावातील जत्रा आठवणीत राहावी अशीच असते. या जत्रेतील खेळणी, व अनेक गोष्टीची मज्जा ही न विसरणारी असते तसेच त्या गावातील एक आगळी वेगळी जुनी पण न बघितलेली मज्जा अनेक जण घेतात जानोरी ह्या गावी गेल्यानंतर शहरातील लोकांना विसर पडेल असे अनेक गोष्टी त्या गावात अनुभवता येतात. जुनी पद्धत आणि जीवन मनसोक्त जगता येते गावकरी मोठ्या उत्साहाने जानोरी गावातील जत्रेला सहकार्य करतात.

गावात प्रत्येकाच्या घरासमोर वेगवेगळी दुकाने ही लावली जातात व वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन देखील करून स्त्री मधील देवी बाहेर पडण्यासाठीही प्रोत्साहन पर उपक्रम राबविले जातात. जानोरीतील जत्रा ही गावातील एक मोठी जत्रा असते. त्यामुळे जानोरी गावाला एक वेगळी ओळख जगदंबा माता मंदिरामुळे मिळाली आहे.

जगदंबा माता ही नवसाला पावणारी माता म्हणून ओळखले जाते इथे होमहवन केला जातो. जानोरी गावातील अनेक गोष्टी मुळे या गावाला मोठ्या प्रमाणावर सध्या प्रसिद्धी मिळते. शहरातील अनेक युवक युवतींना लाजवेल असल्या कला तिथे गावातील मुल व मुलींमध्येदेखील बघायला मिळतात.

अनेक चित्रपट वगैरेच्या शुटिंगसाठी देखील जानोरी गावाला स्थान मिळते पण खरे तर जानोरीतील मंदिरे आणि त्यामागील अनेक उपक्रम, भक्ती , मनोभावाने भक्त करत असतात. त्यामुळे जानोरी गावातील इतिहास आणि बरंच काही वेगळं जाणवत

Related Stories

No stories found.