जानोरी : सकल मराठा समाजातर्फे लाक्षणिक  उपोषण

जानोरी : सकल मराठा समाजातर्फे लाक्षणिक उपोषण

राजकीय नेत्यांना गावबंदी

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जानोरी येथील सकल मराठा समाजातर्फे दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतच्या समोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. तालुक्यातील इतर गावांप्रमाणे जानोरी गावातही राजकीय नेत्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे‌.

याबाबतचे फलक जानोरी गावच्या प्रवेशद्वारावरच झळकवले आहे. आज गावातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते लाक्षणिक पद्धतीने उपोषण करून सरकारचा निषेध व्यक्त केले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मंजूर करून आरक्षण त्वरित द्यावे अशी मागणी जानोरी सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com