Video : जनता की बात : प्रभाग क्रमांक ९ - रस्ते व उद्यानांच्या दुरवस्थेची ओरड

Video : जनता की बात :  प्रभाग क्रमांक ९ - रस्ते व उद्यानांच्या दुरवस्थेची ओरड

सातपूर | रविंद्र केडीया Satpur

प्रभाग क्र.9 Ward No 9 भागातील नागरिकांच्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी ऐकायला मिळाल्या. या भागातील रस्त्यांवर काम होणे गरजेचे आहे.काही ठिकाणी उद्यांनाची दुरवस्था असल्याचे बोलण्यातून दिसून आले.

शिवाजीनगर व श्रमिकनगर Shivajinagar , Shramik Nagar भागातील आयटीआय कॉलनी या भागातील रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. या भागातील रस्ते कायमस्वरुपी दर्जेदार करण्यात यावेत.

कमलताई ज्योती शेवरे आयटीआय कॉलनी

श्रमिकनगर भागातील उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. मुलांना वृद्धांना याभागात जाण्यासाठी सोय नाही. त्यामुळे या भागातील उद्याने सुशोभित करण्यात यावेत त्यांची देखभाल करावी. नरेंद्राचार्य उद्यानासह सर्वच उद्याने चांगले व्हावीत.या ठिकाणी मुलांसाठी खेळणी बसवण्यात यावीत.

लताबाई कोंडाजी नाठे , श्रमिकनगर

या भागातील भव्य असलेले वसंतराव कानेटकर उद्यान देखभालीअभावी खराब झालेले आहे. त्या उद्यानाला सुशोभित करण्यात यावे. उद्यान परिसरातील रस्ते चांगले करण्यात यावेत.या भागात पथदिप बसवण्यात यावेत. कानेटकर उद्यानातही दिवे लावण्यात यावेत. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन व्हावे हीच इच्छा आहे.

राजेंद्र राणे, फाशीचा डोंगर परिसर

श्रमिकनगर भागातील गुंठेवारी परिसरातील अनेक रस्ते बनवण्यात आलेले नाहीत.ते बनवून खराब झालेले रस्ते चांगले करण्यात यावेत, जलशुध्दिकरण प्रकल्पाकडे जाणारे रस्ते दर्जेदार करावेत व रस्त्याच्या दुतर्फा सूशोभिकरण करावे.

प्रकाश बोरोले , श्रमिकनगर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com