जनता की बात - प्रभाग क्रमांक 2 : रुग्णालयाची आवश्यकता

जनता की बात - प्रभाग क्रमांक 2 : रुग्णालयाची आवश्यकता

नाशिक | रवींद्र केडिया Nashik

आडगाव परिसरात सरकारी रुग्णालय होण्याची गरज आहे तसेच या परिसरात रस्ते व ड्रेनेज यंत्रणा चांगल्या पद्धतीने उभारण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी मनपाची असलेली शाळा चांगल्या पद्धतीचे बनवण्याची गरज आहे.

-समाधान शिंदे

या परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवणे गरजेचे आहे उद्यान चांगले असले पाहिजे रस्ते मोठे करावे.

-आयुब सय्यद

या परिसरात अनेक विकास कामे झालेली आहेत आणखी विकास कामे होणे गरजेचे आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्य रस्ता हा चौपदरीकरण करून विकसित करणे गरजेचे आहे. हायवे ओलांडून मुलांना शाळेत जावे लागते सायकलीवर शाळेत जाणार्‍या मुलांची मोठी अडचण होत आहे त्यांच्या सोयीसाठी तो रस्ता असणे गरजेचे आहे नेत्रवती नदी च्या पुढे आडगाव मध्ये घेतला होता त्याची दुरवस्था झालेली आहे हा तलाव व्यवस्थित करून बांधणे गरजेचे आहे भाजीबाजार हा दोन ठिकाणी भरला जातो त्याला सुसज्ज इमारत बांधून व्यवस्थित करावं.

-ओमप्रकाश अग्रवाल

वडगाव परिसरात रस्त्यांची अडचण आहे गाव परिसरातील रस्ते खराब आहेत जूने 10 वर्षापूर्वीचे आहेत ते नवे बनले पाहिजेत ठिकाणी पथदीप हे बंद करतात अखंडपणे चालू राहिले पाहिजे. स्मशानभूमी न्यू इंग्लिश स्कूल या परिसरातील ह्या अखंडपणे चालू राहणे गरजेचे आहे. मराठी शाळेकडे ही इमारत जुनी आहे आणि रस्ता व्यवस्थित होणे गरजेचे आहे.

-दौलत शिंदे

Related Stories

No stories found.