जनता की बात : प्रभाग क्र.१५ - प्रभागाचा अभ्यास असणारा नगरसेवक हवा

जनता की बात : प्रभाग क्र.१५ - प्रभागाचा अभ्यास असणारा नगरसेवक हवा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिक्षीत तरुण व प्रभागातील स्थानिक नगरसेवक असावा. लोकांच्या अडीअडचणी समजून त्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नगरसेवक हवा. प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणारा व वेळोवेळी आरोग्य शिबीर लावून आरोग्य सुविधा देणारा नगरसेवक हवा. नगरसेवक लोकांच्या हाकेला उत्तर देणारा व सहज उपलब्ध होणारा पाहिजे.

सुब्हान शेख

लोकांच्या समस्या जाणून घेणारा व त्यांना त्वरीत सोडवणारा तसेच शिक्षीत, युवा व स्थानिक नगरसेवक प्रभागाला मिळाला पाहिजे. प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी स्वता बाहेर फिरणारा नगरसेवक हवा. प्रभागातील खुल्या जागेत ग्रीन जिम सारखे सामुग्री लावण्यात आली. त्याकडे व उद्यानांमध्ये विशेष लक्ष देणारा नगरसेवक पाहीजे. सफाईकडे लक्ष देणारा व लहान मुलांसाठी उत्तम दर्जाचे उद्यान देणारा नगरसेवक हवा.

औसाफ हाशमी

मागील सुमारे दोन वर्षापासून करोनामुळे लॉकडाऊन झाले. याकाळात काही नगरसेवकांनी उत्तम काम केले, मात्र काहींनी प्रभागातील नागरिकांकडे लक्षच दिले नाही, तसा नगरसेवक आम्हाला नको. आमच्या सुखदु:खात सामील होणारा, अभ्यासू व युवा नगरसेवक हवा. सध्या बेरोजगारी खुप वाढली आहे. यामुळे गुन्हेगारी व व्यसनाकडे तरुण जातांना दिसत आहे. अशा तरुणांना योग्य दिशा देणारा व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारा नगरसेवक हवा.

एक महिला नागरिक

कार्यालयात बसून काम करणारा नगरसेवक नसावा तर प्रभागातील सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा नगरसेवक हवा. प्रभागात विकास कामे करतांना मनपाच्या समाज मंदिरे, उद्याने यांची देखभाल करणारा, त्याकडे लक्ष देणारा, मूलभूत सुविधा देणारा, तरुण शिक्षीत व अभ्यासू नगरसेवक हवा रोज प्रभागात दिसणारा नगरसेवक हवा. मनपाचे सेवक, अधिकारी प्रभागात काम करीत आहे की नाही, याकडे लक्ष ठेवणारा, महिलांना सुरक्षा देणारा नगरसेवक हवा.

शकील शेख

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com