सटाण्यात उद्या पासून जनता कर्फ्यू
USER

सटाण्यात उद्या पासून जनता कर्फ्यू

सटाणा। प्रतिनिधी

करोना बाधितांसह सोबतच तरूणांची मृत्यू संख्या वाढल्याने अखेर शुक्रवार दि. 16 पासुन 1 मे पर्यंत पंधरा दिवसांचा सटाणा शहरात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

बागलाणचे तहसीलदार जितेंद्र पाटील इंगळे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, माजी आमदार संजय चव्हाण व नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सांयकाळी 6 वा. येथील तहसिल कार्यालयात बैठक संपन्न झाली.

शुक्रवार दि. 16 ते 1 मे या पंधरा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला असला तरीही शहरातील किराणा व भाजीपाला सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. मेडीकल दुकाने सकाळी 10 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार असुन उर्वरित सर्व व्यवसाय व आस्थापना बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच शहरात विनाकारण रस्त्यांवर हिंडणार्‍या युवकांसह नागरीकांची पोलिस रॅपिड टेस्ट करणार असुन त्यांची रवानगी कोवीड सेंटर्स येथे करण्याचे निश्‍चित करण्यात आले. तसेच आस्थापना व दुकाने मागील दारून सुरू ठेवणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली.

सर्वपक्षीय बैठकीत माजी नगराध्यक्ष विजय वाघ, उपाध्यक्ष दिपक पाकळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, काकाजी सोनवणे, मनोहर सोनवणे, दत्तु बैताडे, राकेश खैरणार, भाजपा शहराध्यक्ष राहुल सोनवणे, मनसेचे पंकज सोनवणे, मंगेश भामरे, जगदिश मुंडावरे,रत्नाकर सोनवणे, राजेंद्र राका, प्रदीप भांगडीया, विकास दशपुते, प्रदीप बच्छाव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com