
नाशिक । प्रतिनिधी Nashik
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांंना शुक्रवारी (दि.10) सायंकाळी प्रदान करण्यात येणार आहे.
एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुस्काराचे स्वरुप आहे. सायंकाळी सहा वाजता कालिदास कलामंंदिरात प्रतिष्ठाणचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगाकर यांंच्या हस्ते व ज्येष्ठ लेखक, नाटककार महेश एलकुंचवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
माजी आमदार हेमंंत टाकले, अॅड. विलास लोणारी, कार्यवाह मकरंद हिंगणे, लोकेश शेवडे, प्रकाश होळकर, अजय निकम, अॅड. राजेंद्र डोखळे, गुरुमीत बग्गा, सीसीलिया कार्र्होलो, चंद्रकांत कुलकणीर्र्र् व सहकारी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज त्यांच्या स्मरणार्थ कुसुमाग्रज प्रतिष्ठान एक वर्षाआड गोदागौरव आणि जनस्थान हे दोन पुरस्कार देते. यावर्षी जनस्थान पुरस्काराचे 17 वे वर्ष आहे. मागील पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना 2021 मध्ये देण्यात आला होता.
यंदाची निवड जनस्थान पुरस्कार निवड समितीच्या संध्या नरे-पवार, अनुपमा उजागरे, प्रफुल्ल शिलेदार, सदानंद बोरसे, अविनाश सप्रे यांनी केली. बगे यांच्या सात कादंंबर्या, 13 लघुकथा संग्रह, ललीत लेखनाची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांंचा मारवा कथासंग्रह प्रसिध्द आहे. भूमी, त्रिदल कादंंबर्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहे. भूमी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. कुटुंंबातील स्रियांची घुसमट त्यांनी प्रकर्षाने मांंडली आहे.