जनलक्ष्मी बँके निवडणूक: सत्ताधारी समृध्दी पॅनलने दणदणीत विजय

जनलक्ष्मी बँके निवडणूक: सत्ताधारी समृध्दी पॅनलने दणदणीत विजय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकसह (nashik) मुंबई (mubai), नवी मुंबई (Navi Mumbai), पुणे (pune), मालेगाव (malegaon) असे राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या

जनलक्ष्मी बँकेच्या (Janalakshmi Bank) संचालक मंडळाच्या निवडणूकीत (election) सत्ताधारी समृध्दी पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. यापुर्वीच पॅनलचे उत्तमराव उगले व शद गांगुर्डे यांची बिनविरोध निवड (Uncontested choice) झाली होती.आज 13ही उमेदवार विजयी झाले. विरोधकांचेे पाणीपत झाले.

विस्तृत कार्यक्षेत्रात तब्बल 28300 मतदारांपर्यंत कमी वेळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत उमेदवारांना करावी लागली होती. बँकेच्या संचालक मंडळाची (Board of Directors) मुदत संपल्यानंतरही कोविडच्या (corona) निर्बंधांमुळे निवडणुकीला (election) दोन वर्ष उशीर झाला होता. माजी संचालक संजय चव्हाण, रत्नाकर गायकवाड यांसह संदीप नाटकर, विजय राऊत, आशा चव्हाण, यांच्या विरेाधी उमेदवारीमुळे निवडणूक चुरशीची झाली होतीे. समृद्धी पॅनलची कपबशी निशाणी घेतली.

इतर उमेदवारांना पतंग, गॅस सिलिंडर, विमान अशी निशाणी मिळाली होतीे. त्यात समृध्दी पॅनलचे रविंद्र अमृतकर, आंनंद करावा, समीर कांबळे, सागर कांबळे, जयंंंत जानी, भालचंद्र पाटील, महेंद्र बच्छाव,श्रीकांत रहाळकर, जितेंद्र सामंत, संतीश सोनवणे , शालीनी डुंंबरे, स्वप्नाा निंबाळकर, हे विजयी झाले. विजय राऊत,संदीप नाटकर संजय चव्हाण ,रत्नाकर गायकवाड, आशा चव्हाण, यांचा दारुण पराभव झाला.

निवडणुक एकतर्फी झाली. विरोधातील तीनही उमेदवार बरेच वर्ष संचालक होते.या निवडणुकीत त्यांना सत्तादारी गटाने संधी न दिल्याने ते विरोधात उभे ठाकले होते. मात्र त्यात यश आले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com