दिंडोरी । DIndori

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडकओहळ पैकी जांबुनपाडा येथे पिण्याचे पाणी, रस्ता, स्मशानभुमीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे त्वरीत या समस्या सोडवण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जांबुनपाडा तालुक्यापासून अंतर 60 ते 65 कि.मी. आहे. खडकओहोळ पासून 2.50 ते 3 कि.मी. या पाड्यात अंतर पडते. जांबुनपाडा येथे आता पर्यंत या गावाला रस्ता, पाण्याच्या सोयीसाठी गावकरी वाट बघत आहेत. परंतु कुणालाही या पाड्याचा रस्ता सापडलेला नाही. रस्तासोडून सापडणार नाही. रस्ता कागदावर आहे की, नदीने वाहून नेला असावा हिच गत या पाड्याची झाली आहे.

जांबूनपाडा गावातील तरुणांनी एकत्र येत दुसरीकडे माती मुरूम टाकून रस्ता केला आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळुन 74 वर्ष पुर्ण झाले असले तरी अजुन जांबूनपाडा या गावाला रस्ता झालेली नाही. ग्रामपंचायतीनी विहिरी खोदली आहेत, परंतु बांधकाम केलेले नाही. सध्या विहिरीत अल्प प्रमाणात पाणी आहे, परंतु पिण्यासाठी उपयुक्त नसल्याने केळीचा झिरा आहे, त्या ठिकाणीहुन नागरिक पाणी अशुद्ध पाणी पितात.

काही महिन्यात ते सुद्धा पाणी कमी होईल. त्यावेळी उन्हाळ्यात वरती आंब्यांचा तांबडमाळत अर्धा कि. मी. डोंगर चढून पाणी उपलब्ध आहे. डोंगराच्या कुशीत माणसाला पायी रिकामं चालता येणार नाही, असा हा डोंगर आहे अशा ठिकाणीहुन पाणी महिला डोक्यावर कशा आणत असतील हेच आमचे स्वातंत्र असे जांबूनपाड्यातील महिला सांगतात. अशावेळी पावसाळ्यात तर पायी चालण्यासाठी देखील रस्ता नाही. पाणी पिण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही.

गावातील सर्व महिला ह्या ओढ्यावर पाण्याला जातात. हे प्रशासनाचे अपयश म्हणाचे की जांबुनपाडा या गावातील आदिवासी बाधवांचे. गावातील माणस ही साधी भोळी गरीब आहेत, पण ते देखील माणसचं ना? ह्या गावात एकुण 29 कुटुंब असुन 189 इतकी लोकसंख्या आहे. गावात पहिली ते चौथी शाळा आहे.

एकुण 17 मुले आहेत. अंगणवाडी आहे, त्यात एकुण 21 मुले आहेत. गावाला लागूनच दुसर्या डोंगरावर घोटपाडा नावाचे वस्ती आहे, तेथील मुले याच शाळेत येतात. पण जांबुनपाडा या गावात येताना एक मोठा ओढा आहे. त्यामुळे येता जाताना मुलांच्या जीवाला धोका आहे.

खडकओहळहुन जांबुनपाडा या गावात येताना एक मोठी नदी आहे. त्या नदीवर 40 ते 50 वर्षपूर्वी तलाव बांधकाम अर्धवटस्थितीत आहे. तलावाचा पूर्ण केला असता तर खडक ओहोळ ग्रामपंचायत सुजलाम सुफलाम झाली असती परंतु गावाचे दुर्दैव पाण्यासाठी.

पुढे गेल्यावर पुन्हा एक मोठा ओहळ आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील माणसांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्वरीत या समस्यांना सोडवण्यात याव्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.