नांदूरमध्यमेश्वर धरणाचे जलपूजन

नांदूरमध्यमेश्वर धरणाचे जलपूजन

निफाड। प्रतिनिधी Niphad

गंगापूर, दारणा, पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पुर पाण्यामुळे चांदोरी, सायखेडा येथील पीके पाण्याखाली जावून नांदूरमध्यमेश्वर धरणात Nandurmadhyameshwar dam पाणी साठा वाढल्याने आमदार दिलीप बनकर यांनी गोदाकाठ परिसरातील पीक नुकसानीसह नांदूरमध्यमेश्वर धरणाची पाहणी करीत या धरणाला वाढीव दरवाजे बसविण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगून गोदाकाठ गावांना पुराचा धोका बसू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आमदार दिलीप बनकर MLA Dilip Bankar यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजन Jalpujan करण्यात आले.

आमदार बनकर यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणाची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत जलसंपदा विभागाचे उपअभियंता थोरात, शाखाधिकारी नागरे आदींसह गोदाकाठचे ग्रामस्थ उपस्थित होते. आघाडी शासनाच्या काळात देखील आ. बनकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्याने या धरणाचे नूतनीकरण करण्यात आले होते. परिणामी सायखेड्यासह गोदाकाठ गावांना बसणारा पुरपाण्याचा फटका कमी झाला होता.

मात्र मंगळवारी गंगापूर, दारणा, पालखेड धरणातून अधिक पाणी सोडण्यात आल्याने हे पाणी चांदोरी, सायखेड्यासह गोदाकाठ शिवारातील शेतात जावून पिकांचे नुकसान झाले. परिणामी या नुकसानीची पाहणी करत पुरपाण्याचा धोका कमी व्हावा यासाठी आता नांदूरमध्यमेश्वर धरणाला आणखी वक्राकार दरवाजे बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. यामुळे पुर पाण्याचा बसणारा फटका कमी होणार आहे.

यावेळी आ. बनकर यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणाची पाहणी करत या धरणाचे जलपूजन केले. याप्रसंगी पिंपळगाव बाजार समिती संचालक नंदू सांगळे, महेश कुटे, वसंत जाधव, मधूकर राजोळे, सुभाष शिंदे, राजेंद्र कुटे, सोमनाथ सोनवणे, गणपत हाडपे, राधाकिसन हाडपे, संजय सांगळे, विलास अडसरे, रवींद्र जोशी, रावसाहेब निंबाळकर उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बनकर यांनी धरणातील पाण्याचे जलपूजन केले.

Related Stories

No stories found.