माणिकपुंज धरणाचे जलपूजन
नाशिक

माणिकपुंज धरणाचे जलपूजन

आ.सुहास कांदे यांच्या हस्ते विधिवत जलपूजन

Sanjay More

Sanjay More

नांदगाव ।प्रतिनिधी

नांदगावशहर व तालुक्यातील गावांना संजीवनी ठरणारे माणिकपुंज १०० टक्के भरल्याने तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते माणिकपुंज धरणाचे विधिवत पुजा करून जलपूजन करण्यात आले.

तालुक्यातील पूर्व भागातील जळगांवबुद्रुक,न्यायडोंंगरी,पिंंपरखेड,मुळडोंगरी,सावरगाव, कासारी,बाणगांव,कसाबखेडा,जळगांव खुर्द, हिगणेदेहरेसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिचनासाठी उपयुक्त ठरले आहे. नांदगाव शहरासाठी पिण्यासाठी आरक्षित होत असल्याने दिलासा मिळाला आहे.

यावेळी पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, कृषी उत्पन्न बाजार समिति सभापती तेज कवडे, संचालक एकनाथ सदगिर, विलास आहेर, विजय इप्पर, आनंद कसलीवाल, श्रीकांत परदेशी, प्रमोद भाबड, संतोष कांदे, तालुकाप्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख सुनिल जाधव, सागर हिरे, कांतीलाल इप्पर आदिंसह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com