केळझर डाव्या कालव्याचे जलपूजन

लाभक्षेत्रातील गावांना पूरपाण्याचा लाभ : खा. भामरे
केळझर डाव्या कालव्याचे जलपूजन

सटाणा । प्रतिनिधी | Satana

बागलाण तालुक्यातील (Baglan taluka) सिंचन प्रकल्पांचे काम (Working of irrigation projects) मार्गी लावल्याचे मोठे समाधान असून आगामी काळात जास्तीत जास्त गळती रोखण्याचे काम करून

कौतिकपाड्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पाणी येईल अशी पाटाची रचना केली जाईल. वाढीव चारी क्रमांक 8 लवकरच मंजूर करून उर्वरित गावांनाही केळझरच्या पूरपाण्याचा लाभ करून दिला जाईल, असे आश्वासन माजी केंद्रियमंत्री खा.डॉ. सुभाष भामरे (Former Union Minister MP Dr Subhash Bhamre) यांनी दिले.

केळझर धरणाच्या (Kelzar Dam) डाव्या कालव्याद्वारे (left canal) चारी क्रमांक 8 ला पूरपाणी आल्याने कौतिकपाडे येथे खा.डॉ. भामरे यांच्या हस्ते जलपूजन (Jalpujan) करण्यात आले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करणतांना ते बोलत होते.

तालुक्यातील सिंचन प्रकल्प (irrigation project) मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Former Water Resources Minister Girish Mahajan) यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे सांगून दोन्ही कालव्यांमुळे 20 ते 25 गावांचा पिण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे खा.डॉ. भामरे यांनी सांगितले. वाढीव केळझर चारी क्र. 8 मुळे भाक्षी, मुळाणे, कर्‍हे, चौगाव, अजमीर सौंदाणे, देवळाणे, वायगाव, सुराणे आदी गावांपर्यंत पाणी पोहचणार असून हा प्रस्ताव अंतीम टप्प्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी लाभधारक शेतकर्‍यांनी (farmers) फटाक्यांची आतषबाजी करून पूरपाण्याचे स्वागत केले. केळझर धरणापासून (Kelzar Dam) 20 कि.मी. केळझर डावा कालवा व 10 कि.मी. चारी क्रमांक 8 चे काम पूर्ण झाले असून खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या विशेष प्रयत्नातून 0 ते 5 कि.मी. गळती रोखण्यासाठी 4 कोटी रुपयांची पाईपलाईन (Pipeline) मंजूर झाली.

त्यामुळे गळती होऊन शेतकर्‍यांचे (farmers) नुकसान टळणार असून डोंगरेजजवळ कान्हेरी नदीतून 1 कि.मी. अंतराची पाईपलाईन टाकल्याने चारी क्रमांक 8 ला पाणी मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चारीत पाणी पडताच शेतकर्‍यांनी एकच जल्लोष केला. भविष्यात उरलेली कामे पूर्ण झाल्यास लाभ क्षेत्रातील गावांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी केळझर चारी क्रमांक 8 कृती समितीचे अध्यक्ष नंदकिशोर शेवाळे, उपाध्यक्ष नानासाहेब मोरकर, सुधाकर पाटील, सुरेश मोरे, कौतिकपाडे सरपंच राजू जाधव, कृउबा संचालक प्रभाकर रौंदळ, केशव मांडवडे, जिभाऊ मोरकर, राजेंद्र जगताप, समाधान जाधव, प्रल्हाद पवार, पोपटराव खैरनार, धनसिंग दात्रे, सुरेंद्र दात्रे, तरसाळीचे लखन पवार, वीरगांव सरपंच ज्ञानेश्वर देवरे, वसंत गवळी, राजेंद्र वाघ, कृषी अधिकारी कैलास खैरनार, रामदास पवार, दीपक रौंदळ, मच्छिंद्र रौंदळ, जगदीश रौंदळ,

उमेश रौंदळ, पंडित रौंदळ, निंबा रौंदळ, रमेश रौंदळ, प्रशांत मोहन, मोठाभाऊ चव्हाण, विलास चव्हाण, सतीश सोनवणे, महेश पवार, दीपक जाधव, विजय पवार, नितीन सोनवणे, दत्तू वाघ, साहेबराव चव्हाण, राजेंद्र वाघ, पोपट पवार, किशोर ठोके, जितेंद्र जाधव, बापू बागुल, गोटू बागुल आदिंसह वटार, डोंगरेज, तरसाळी, वनोली, कौतिकपाडे येथील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com