भावली धरण
भावली धरण
नाशिक

भावली धरणाचे भुजबळांच्या हस्ते जलपूजन

Kundan Rajput

नाशिक । Nashik

इगतपुरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून भावली धरण शंभर टक्के भरुन अोव्हर फ्लो झाले आहे. धरण भरल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.७) जलपूजन करण्यात आले.

भावली धरण परिसरात आज अखेर 2151 मिमी पाऊस झाला असून एकूण 1434 दशलक्ष घनफुट पाणीसाठा असलेले भावली धरण पूर्णपणे भरले असल्याने जलपूजन करण्यात आले. या धरणातून आतापर्यंत 948 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली.

यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, उपविभागीय अभियंता प्रमोद कुलकर्णी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, शाखा अभियंता सुरेश जाचक, निवृत्त शाखा अभियंता सुहास पाटील आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com