आजपासून जलदुर्गा यात्रोत्सव

आजपासून जलदुर्गा यात्रोत्सव

डांगसौंदाणे । वार्ताहर | Dangsaundane

अक्षय तृतीयेच्या (akshaya tritiya) मुहुर्तावर येथील ग्रामदैवत जलदुर्गा मातेच्या यात्रोत्सवाचे (yatrotsav) आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे यंदा 11 वे वर्ष असून तीन दिवसीय यात्रेचे ग्रामस्थ व यात्रा समितीने नियोजन केले आहे. दि. 2 ते 4 मेदरम्यान होणार्‍या या यात्रोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासह (Religious and cultural programs) कुस्त्यांची विराट दंगलही आयोजित करण्यात आली आहे.

दि. 2 मेरोजी दुपारी ग्रामदैवत जलदुर्गा मातेची रथ मिरवणूक (Chariot procession) काढण्यात येणार आहे. परंपरेनुसार सटाणा पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार (Satana Police Inspector Subhash Anmulwar) हे रथपूजन करतील. रथसेवेचे आयोजन अनंत गायकवाड यांनी केले आहे.

दि. 3 मेरोजी पहाटे जलदुर्गा माता मूर्ती अभिषेक व पूजा उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे व योगिता सोनवणे, तलाठी आतिष कापडणीस व वैशाली कापडणीस, शेतकरी योगेश सोनवणे व वैशाली सोनवणे या तिघा दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच दिवशी भरणार्‍या यात्रेनिमित्त आरम नदीपात्रात कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली आहे.

कुस्त्यांचे आयोजन यात्रा समिती व तुळजाभवानी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे (Sanjay Sonawane, President of Tulja Bhavani Education Society) यांनी केले आहे. दि. 4 मेरोजी रात्री 8 वाजता समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन प्रगतशील शेतकरी विठ्ठल नामदेव सोनवणे व यात्रा समितीने केले आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे व व्यापारी आबासाहेब देशमुख यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यात्रोत्सवात व्यापारी, भाविक व कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा कमिटी व डांगसौंदाणे ग्रामपंचायतीने केले आहे.

करोना काळात 2 वर्ष यात्रोत्सव साजरा करता आला नाही. यावर्षी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी नियोजन करीत यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यात्रेनिमित्त कीर्तन, कुस्त्यांची दंगल, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. परिसरातील ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.

- सोपान सोनवणे, जलदुर्गा यात्रा समिती प्रमुख

Related Stories

No stories found.