गंगापूर धरणाचे शुक्रवारी जलपूजन

गंगापूर धरणाचे शुक्रवारी जलपूजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरण Gangapur Dam समुह शंभर टक्के भरल्याने आता येत्या शुक्रवारी (दि.1) महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarni यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे.

गेल्या आठवड्यात नाशिक शहरासह धरण क्षेत्रात संततधार मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या साठ्यात मोठी वाढ झाली.

गंगापूर धरणातून जवळपास 10 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला महापूर येऊन गेला. धरणांंमध्ये अपेक्षित जलवाढ झाल्याने नाशिक शहराचा पिण्याच्या पाण्याचा आणि जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

जून आणि आॉगस्ट या तीन महिन्यांतही अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणांच्या साठ्यात वाढ होऊ शकली नव्हती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र गेल्या आठवड्यातील पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. म्हणूनच महापौर सतीश कुलकर्णी यांनी जलपूजनाचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.