महिरावणी ग्रामस्थांकडून जलपूजन

महिरावणी ग्रामस्थांकडून जलपूजन

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नासर्डी नदीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकरोडवरील महिरावणी गावातील पाझर तलाव पावसाने पूर्ण भरल्याने ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी पाणी वाचविण्याचा संदेश देत जलपूजन केले.

उपसरपंच रमेश खांडबहाले यांनी ग्रामस्थांना एकत्र करून जलपूजनाचा कार्यक्रम घडवून आणला. यावेळी सरपंच आरती गोराळे, ग्रामसेवक सावकर, गोरख खांडबहाले, पंडित गोराळे, मनोहर वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.