सॅनिटायझर मशीन
सॅनिटायझर मशीन |digi
नाशिक

आयटीआयच्या शिक्षकाने अवघ्या तीन दिवसात बनवले सॅनिटायझर मशीन

मोबाईल चार्जरने चार्ज करता येणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : Nashik

नाशिक येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या विषयाचे शिल्पनिदेशक संजय म्हस्के यांनी अत्यंत अल्प खर्चात आणि नियमित वापरात असणाऱ्या उपकरणांच्या साह्याने हे मशीन तयार केले आहे.

रोजच्या उपकरणांमध्ये दिसणाऱ्या माउंट बोर्ड, बारा वोल्ट डीसी मोटर, सेन्सर्स, ट्रांजिस्टर, रिचार्जेबल बॅटरी आदी साहित्य वापरून एक लीटर क्षमतेचे सॅनिटायझर मशीन तयार केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व काळजी घेण्यात आली आहे. नेहमीच्या वापरातील मोबाईल चार्जर च्या मदतीने हे मशीन चार्ज होते. मशीनला बसविलेल्या तोटी समोर हात नेले की हातावर सॅनिटायझर आपोआप पडेल अशा पद्धतीची मशीन ची रचना आहे.

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक संचालक मा. श्री आर. एस.मानकर साहेब यांच्यासमोर श्री म्हस्के यांनी मशीन चे सादरीकरण केले. शिल्पनिदेशक संजय म्हस्के यांनी अवघ्या तीन दिवसात हे मशीन तयार केले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सौ माधुरी भामरे गट निदेशक श्री मोहन तेलंगी श्री विवेक रनाळकर उपस्थित होते.

विद्यार्थिनींना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल अशा निर्मितीचा विचार करून या मशिन ची निर्मिती केली आहे आज हँड सॅनिटायझर ची सर्वत्र गरज असून कोठेही सहज उपयोगात येईल यापद्धतीने हे यंत्र निर्माण केले असून पुर्णतः सुरक्षित आहे.

-संजय म्हस्के, शिल्पनिदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) नाशिक.

Deshdoot
www.deshdoot.com